तरुण भारत

कोरोना प्रतिबंधक लस देण्यात बेळगाव जिल्हा दुसऱयास्थानी

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये बेळगाव जिल्हय़ाने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ाने ही कामगिरी बजावली आहे. नियोजनबद्धरित्या मोहीम राबविल्यामुळे आम्हाला यश आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisements

बेळगाव जिल्हय़ामध्ये शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी लसीकरण मोहीम राबविली गेली. त्यामध्ये एका दिवसातच 2 लाख 57 हजार 604 जणांनी याचा लाभ घेतला. गेल्या काही दिवसांपासून आम्ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नियोजन केले होते. अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यामध्ये ही मोहीम राबविण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार मोहीम राबविली गेली. जनतेने तसेच सर्वांनीच सहकार्य केले. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो, असे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी जिल्हय़ामध्ये 1 हजार 200 केंदे स्थापन करण्यात आली. महिला आणि बाल कल्याण खाते तसेच तहसीलदार, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाने दिलेले सहकार्य, उद्योजकांनी केलेले सहकार्य यामुळेच आम्ही हे उद्दिष्ट गाठू शकलो, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.

जिल्हय़ातील सर्व तालुक्मयांमध्ये सकाळपासूनच लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंदे, खासगी हॉस्पिटल या ठिकाणी पूर्ण मोफत लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण करण्यासाठी बिम्स हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल्सनी नर्स तसेच इतर कर्मचारी आम्हाला पुरविले. त्यामुळे हे शक्मय झाले आहे. दुसरा डोस घेण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती. जवळपास 70 हजार जणांनी दुसरा डोस घेतल्याची माहितीही जिल्हाधिकाऱयांनी दिली.

या सर्व कर्मचाऱयांची जेवणाची तसेच इतर सुविधांची सोय करण्याची जबाबदारी महापालिका, तहसीलदार आणि ग्राम पंचायतकडे सोपविण्यात आली होती. त्यांनीही उत्तमप्रकारे सुविधा पुरवून साऱयांची सोय केली. याबद्दल आम्ही साऱयांचेच धन्यवाद मानत असल्याचेही सांगितले.

कोरोनाची सध्याची परिस्थिती दिलासादायक आहे. जिल्हय़ामध्ये अत्यंत कमी रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण कमी झाले आहे. जिल्हय़ातील अनेक मंदिरे बंद आहेत. ती लवकरच खुली करण्याबाबत अधिकाऱयांची बैठक घेऊन मार्गसूची लागू करून मंदिरे खुली करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे मंदिर खुले करण्यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. त्याचा विचार करूनच हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   

Related Stories

हंगामी कामगाराला भरपाई देण्याबाबत पेच

Omkar B

मनपा निवडणूक प्रकियेला प्रारंभ

Amit Kulkarni

गीतरामायणातील काव्यरचनांचे सुरेल सादरीकरण

Amit Kulkarni

केंद्राप्रमाणे राज्य सरकारने नोकरवर्गाला वेतन द्यावे

Patil_p

कापोली-कोडगई रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni

हलगा गावातील गरजू नागरिकांसाठी सरसावले मदतीचे हात

Omkar B
error: Content is protected !!