तरुण भारत

मनपाची निवडणूक पुन्हा पारदर्शकपणे घ्यावी

उमेदवारांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला आहे. व्हीव्हीपॅट बसविण्यात आले नाहीत. अनेकांची नावे 3 ते 4 वेळा मतदार याद्यांमध्ये दाखल करण्यात आली आहेत. यामुळे ही निवडणूक पारदर्शक झाली नाही. तेव्हा पुन्हा महापालिकेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवडणूक लढविलेले उमेदवार मोतेश बारदेशकर आणि मुक्तार इनामदार यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.

महापालिकेची निवडणूक अत्यंत घाईगडबडीत घेण्यात आली. मतदारयाद्यांमध्ये मोठा गोंधळ करण्यात आला. अनेकांची नावे कमी करण्यात आली नाहीत, तसेच काही जणांची नावे जाणूनबुजून गाळण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ईव्हीएम यंत्राद्वारे निवडणूक घेताना व्हीव्हीपॅट जोडणे बंधनकारक आहे. असे असताना बेळगावमध्येच व्हीव्हीपॅट का जोडले गेले नाही? असा प्रश्नही त्यांनी निवेदनामध्ये उपस्थित केला आहे.

महापालिकेची निवडणूक पारदर्शक झाली नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवडणूक घेतली गेली. त्यामुळे पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी या  उमेदवारांनी केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उमेदवारांसह कार्यकर्तेही उपस्थित होते. 

Related Stories

सुवर्णसौध समोर मुख्यमंत्र्यांना मानवंदना

triratna

हेस्कॉमच्या कारभारामध्ये सुधारणा करा

Patil_p

कठोर निर्बंधांबाबत आज बैठक

Patil_p

जैन इलेव्हन, स्पारटन्स, ब्लास्टर, सुपर किंग्स उपांत्य फेरीत

Patil_p

शहापूर मंगाई देवीची यात्रा साध्या पद्धतीने

Patil_p

येळ्ळूर ग्रा. पं. वर म. ए. समितीचा झेंडा

Amit Kulkarni
error: Content is protected !!