तरुण भारत

पार कुमठे गावच्या हद्दीत गुराख्यांना दिसला ब्लॅक पँथर

परिसरात पसरले घबराटीचे वातावरण 

महाबळेश्वर / प्रतिनिधी : 

Advertisements

घनदाट सदाहरित जंगलांनी वेढलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे या गावी दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ब्लॅक पँथरचे दर्शन स्थानिक गुराख्यांना झाले. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी रवींद्र जाधव, सुभाष जाधव हे दोन युवक गाई चारण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना तेथे काळा वाघ अर्थात ब्लॅक पँथर दिसला. या ब्लॅक पँथरच्या वावर हाच दिवसभर परिसरात चर्चेचा विषय झाला असून हे शेत गावापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमठे हे गाव महाबळेश्वर कोयना खोऱ्यात अतिदुर्गम भागात वसले आहे. हा सर्व परिसर गर्द झाडी जंगल यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर असतो. मात्र दुर्मिळ ब्लॅक पँथर दिसल्याचा दावा स्थानिक युवकांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे. वास्तवात ब्लॅक पँथर हा आजवर महाबळेश्वर अथवा महाराष्ट्रातील कोणत्याही जंगलात पाहिल्याचा दावा यापूर्वी कोणी केल्याची नोंद नाही. सदर घटनेचा व्हिडीओ रविंद्र  मनोहर जाधव यांनी अतिशय धाडसाने आपल्या मोबाईलद्वारे काढला असून तो माहितीस्तव प्रसिध्द केला आहे. 

सदर व्हिडीओमध्ये ब्लॅक पँथर स्पष्ट दिसत असून, वनखात्याने याबाबत तपास करून  योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. तर प्रथमच हा ब्लॅक पँथर महाबळेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रात दिसला असून नामशेष होत असलेली प्रजाती पुन्हा दिसल्याने वन्य प्राणी प्रेमींसाठी ही आनंदाची बाब असून स्थानिकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण आहे.

Related Stories

GPRS प्रणाली नसल्याने रिपाइं छेडणार आंदोलन

datta jadhav

सातारा : दिव्यांग कर्मचार्‍यांची स्वतंत्र सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करावी – अपंग कर्मचारी संघटना

triratna

शिवसेना जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार

datta jadhav

कृष्णा रूग्णालयातून तिघांना डिस्चार्ज

Patil_p

सुरज निकम आणि विजय गुटाळ औंधच्या कुस्ती मैदानात भिडणार

Patil_p

नव्या मासेमारी नियंत्रण कायद्याला स्थगिती द्या!

Patil_p
error: Content is protected !!