तरुण भारत

सुखाच्या घरात रंगला माफीचा एपिसोड

छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. परंतु, मालिकेतील एका सीनमध्ये झालेल्या चुकीमुळे मालिकेच्या निर्मात्यांना प्रेक्षकांची जाहीर माफी मागावी लागली आहे. प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली छोटय़ा पडद्यावरील मालिका ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेने अनेकदा टीआरपी यादीत प्रथम क्रमांक पटकावलाआहे.

  मालिकेतील प्रत्येक कलाकाराला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. परंतु, सध्या मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मालिकेतील एका दृश्यात झालेल्या चुकीमुळे मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. मालिकेत 14 सप्टेंबर रोजी दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Advertisements

मालिकेत दाखवण्यात आलेल्या सँडी या व्यक्तिरेखेच्या ब्लाऊजवर तथागत गौतम बुद्धांचं चित्र छापण्यात आलं होतं. त्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या असून मालिकेच्या निर्मात्यांवर ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आता महेश यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सगळ्यांची माफी मागीतली आहे. व्हिडिओत महेश म्हणाले, ही चूक जाणीवपूर्वक केली गेली नाही याची मी खात्री देतो. मालिकेतील कलाकार आणि वेशभूषा करणारे सगळ्यांना गौतम बुद्धांबद्दल आदर आहे. तुम्ही मोठय़ा मनाने आम्हाला माफ कराल अशी आशा आहे. अशी चूक पुन्हा घडणार नाही याची मी खात्री देतो.

Related Stories

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Rohan_P

तुम्ही जनतेचे सेवक, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही

Rohan_P

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगना राणावत

triratna

सुशांत आत्महत्या : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

Rohan_P

‘भेडिया’त दिसणार वरुण-कृतीची जोडी

Patil_p

17 डिसेंबरला बसणार ‘फ्री हिट दणका’

Patil_p
error: Content is protected !!