तरुण भारत

बाजार भांडवलाच्या यादीत भारत सहावा

अमेरिका भांडवलात अव्वल, भारताने फ्रान्सला टाकलं मागे

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय शेअर बाजार दिवसेंदिवस तेजीचा कल दाखवत असून आघाडीवरच्या देशांच्या यादीत आता भारतीय शेअर बाजार सहाव्या क्रमांकावर आला आहे. भारताने या यादीमध्ये फ्रान्स देशाला मागे टाकण्यात यश मिळवले आहे.

गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने ही कामगिरी केली आहे. भारतीय शेअर बाजारातील बाजार भांडवल 260 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये पाहता बाजार भांडवल 3.54 ट्रिलियन डॉलर इतके होते. फ्रान्समधील बाजार भांडवलाचा वाटा हा 3.39 ट्रिलियन डॉलर इतका आहे. यामध्ये भारताचा वाटा जास्त असल्याने आता या यादीत फ्रान्स बाजार भांडवलात मागे पडला आहे.

आयपीओ आणि बाजार भांडवल

येत्या डिसेंबरपर्यंत एलआयसी कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होण्याची शक्मयता वर्तवली जात असून हा सर्वात मोठा आयपीओ असणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या आयपीओनंतर बाजार भांडवलामध्ये 10 ते 12 लाख कोटी रुपयांची वाढ होऊ शकते असेही म्हटले जात आहे. या प्रमाणे बाजार हा तेजीचीच वाट पकडणार असून याच काळामध्ये नव्या आयपीओंची भर पडणार असून त्यांच्यामुळे बाजार भांडवलामध्ये वाढ होणार आहे. दिवाळीपर्यंत पेटीएमचा आयपीओ दाखल होण्याची शक्मयता वर्तवली जात असून 2 डझनहून जादा कंपन्या डिसेंबरपर्यंत बाजारात लिस्ट होण्याची शक्मयता सांगितली जात आहे.

लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल हे गेल्या 2 महिन्यात 23 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. त्यामध्ये शेअर बाजारात असलेल्या तेजीचाही वाटा मोठय़ा प्रमाणात आहे. लिस्टेड कंपन्यांचे भांडवल वाढण्यामध्ये झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीनेही मोठा वाटा उचलला आहे. या कंपनीच्या लिस्टिंगनंतर बाजारामध्ये एक लाख कोटी रुपयांची वाढ बाजार भांडवलामध्ये दिसून आली आहे.

भारताचा वाटा 2.89 टक्के

जगभरातील बाजार भांडवलाचा विचार करता यामध्ये भारताचे योगदान हे 2.89 टक्के इतके आहे. तर दुसरीकडे फ्रान्समधील बाजार भांडवलाचा वाटा 2.84 टक्के इतका आहे. कॅनडा या देशाचा बाजार भांडवलातील वाटा हा 2.65 टक्के इतका आहे. चीनचे योगदान मात्र 10.43 टक्के टक्के असून जपान 6.19 टक्के आणि हाँगकाँग 5.39 टक्के योगदान देण्यामध्ये आघाडीवर आहेत.

बाजार भांडवलातील

आघाडीचे 6 देश

अमेरिका ……. 50.99 ट्रिलियन डॉलर

चीन …………. 12.41 ट्रिलियन डॉलर

जपान ……….. 7.37 ट्रिलियन डॉलर

हाँगकाँग ……. 6.41 ट्रिलियन डॉलर

इंग्लंड ……….. 3.66 ट्रिलियन डॉलर

ज्या पद्धतीने भारतीय शेअर बाजार हा तेजीचा कल दाखवत आहे ते पाहता डिसेंबरपर्यंत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 61 हजारचा आकडा गाठू शकेल असेही तज्ञांना वाटते आहे. या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या इंग्लंडलाही आपण मागे टाकू शकतो, असेही तज्ञ सांगत आहेत.

Related Stories

ऍपलचे 6,500 कोटी गुंतविण्याचे संकेत

Patil_p

विमान इंधन दर जैसे थे राहणार

Patil_p

प्लॅटफॉर्म तिकिट बंदमुळे नुकसान

Patil_p

‘कोरोना कवच’ आरोग्य विमा पॉलिसी उतरविताना

Omkar B

चीनला होणाऱया निर्यातीत वाढ

Omkar B

‘ओयो’ची आगामी गुंतवणूक युरोपात होण्याचे संकेत

Patil_p
error: Content is protected !!