तरुण भारत

फोर्ड इंडियाकडून उत्पादनाला प्रारंभ

वृत्तसंस्था/ चेन्नई

फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या चेन्नईतील कारखान्यामध्ये पुन्हा उत्पादनाला सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने सदरच्या कारखान्यांमधून इकोस्पोर्ट गाडीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून या गाडीची निर्यात केली जाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisements

काही दिवसापूर्वी फोर्ड इंडिया आपले भारतातील उत्पादन बंद करणार असल्याची बातमी आली होती. त्यानंतर ही कंपनी अधिक चर्चेत आली. उत्पादन बंद करणार असल्याकारणाने अनेकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. कंपनीकडे सध्याला 30000 इकोस्पोर्ट गाडीच्या निर्यातीचे लक्ष असून हे लक्ष यावषी पूर्ण केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याकरीताच पुन्हा चेन्नईत कारखान्यात उत्पादनाला सुरूवात होत आहे.

चार कारखाने

कंपनीचे चेन्नईत 2 तसेच सानंद या ठिकाणी दोन असे एकंदर चार कारखाने आहेत. इकोस्पोर्टच्या गाडीचे उत्पादन चेन्नईमधील एकमेव अशा कारखान्यामध्ये घेतले जात असल्याचेही फोर्ड इंडियाने म्हटले आहे. इकोस्पोर्ट्सची निर्यात ही अमेरिकेमध्ये केली जाते तर अस्पायर व फिगो या गाडय़ा मेक्सीको आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये निर्यात केली जाते.

Related Stories

रोजगार संधींमध्ये 57 टक्के दमदार वाढ

Patil_p

उडान योजनेची गती मंदावली

Patil_p

प्रत्यक्ष कर संकलनात दुप्पटीने वाढ

Amit Kulkarni

मे महिन्यात वाहनांची रिटेल विक्री 55 टक्क्यांनी कमीच

Patil_p

अर्बन कंपनी 1,857 कोटी रुपये उभारणार

Patil_p

शेअर बाजारावर दबावाचे सावट, घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!