तरुण भारत

ग्रामीण भागांमध्ये रोजगार वाढीचे संकेत

एका सर्व्हेत अंदाज- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घेणार गती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ग्रामीण भागांमध्ये येणाऱया काळामध्ये रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचा विश्वास निम्म्याहून अधिक कंपन्यांना वाटतो आहे. सध्याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बऱयापैकी प्रगती साधत असून ग्रामीण भागामध्ये येणाऱया काळात रोजगारात वाढ होऊ शकते.

जीनियस कन्सल्टंट यांच्या ‘सडन राईज ऑफ रुरल एम्प्लॉयमेंट’च्या अहवालात सदरची माहिती देण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला असून यातून रोजगार क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. सर्व क्षेत्रांसह उद्योगांनाही मोठय़ा प्रमाणात प्रभावित व्हावे लागले आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगालाही याचा फटका बसला आहे. पण आता परिस्थिती रुळावर येत असून उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत.

57 टक्के कंपन्यांना विश्वास

सर्वेमध्ये 57 टक्के कंपन्यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये प्रगतीचे वारे वाहत असून येणाऱया काळात लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही म्हटले आहे. ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असल्याचं मत 14 टक्के जणांनी व्यक्त केले आहे. महामारीमुळे मोठय़ा प्रमाणात उद्योग व कारखान्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यात दिसून आला आहे. येत्या काळामध्ये या क्षेत्राला गती येणे गरजेचे असून जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केला जाणे आवश्यक असल्याचेही जिनिअस कन्सल्टंटचे चेअरमन आणि एमडी आर. पी. यादव यांनी म्हटले आहे.

Related Stories

तिसऱया दिवशी सेन्सेक्सचा टप्पा 39 हजार पार

Patil_p

एचडीएफसी बँक लाँच करणार नवीन क्रेडिट कार्ड

Patil_p

‘वर्क फ्रॉम ऍनीवेअर’ टाटा स्टीलची योजना

Omkar B

लॉकडाऊनमध्ये नैसर्गिक गॅस उत्पादन 18.6 टक्क्मयांनी घटले

Patil_p

ऑटो क्षेत्राच्या अडचणी वाढल्या

Patil_p

‘टीसीएस’चा महसूल, नफा तेजीत

Patil_p
error: Content is protected !!