तरुण भारत

रॉयल इनफील्डने 100 जणांना केलं कमी

मुंबई

 दुचाकी वाहन निर्मितीमधील मोठी कंपनी रॉयल इनफील्डने कंपनीतून 100 जणांना कमी केल्याची माहिती आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीने वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानुसार सदरची कर्मचाऱयांची कपात करण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Advertisements

आरामदायी मोटरसायकलच्या क्षेत्रामध्ये रॉयल इनफील्डचा वाटा मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या कंपनीमध्ये 10 हजार जण काम करतात. यापैकी 5 हजार जण हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून कंपनीमध्ये कार्यरत आहेत तर 5 हजार कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत. कंपनीने 90 ते 100 जणांचा वार्षिक स्‍तरावर कामगिरीचा आढावा पाहून त्याप्रमाणे त्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये वरि÷ कार्यकारी ते वरि÷ व्यवस्थापक यांचाही समावेश आहे. गेल्या वषीच्या तुलनेमध्ये यावषी मोटारसायकलींच्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

ऍमेझॉन इंडियाकडून रोजगार निर्मिती

Patil_p

अदानी पोर्टस्च्या नफ्यात वाढ

Amit Kulkarni

टाटा मोटर्सचा स्टेट बँकेबरोबर करार

Patil_p

स्नॅपडीलचा येणार आयपीओ

Patil_p

श्रीमंताच्या यादीत जगात पाचव्या स्थानी अंबानीची झेप

Patil_p

लॉकडाऊनंतर डिझेल विक्री पूर्वपदावर

Patil_p
error: Content is protected !!