तरुण भारत

शेअर बाजार घसरणीसह बंद

सेन्सेक्समध्ये 525 अंकांची तर निफ्टीत 188 अंकांची घट

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची निराशा केल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले.

बाजारात सोमवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 524 अंकांच्या घसरणीसह 58,490.93 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 188 अंकांच्या घसरणीसह 17,396.90 अंकांवर बंद झाला. एकावेळी सेन्सेक्स 58 हजार 400 अंकांवरही खाली आला होता. निफ्टीत एफएमसीजी व्यतिरीक्त इतर क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले होते. धातू निर्देशांक सर्वाधिक 7 टक्के इतका घसरला होता. पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलच्या समभागात 9 टक्के घट झाली होती. जिंदाल स्टील, एनएमडीसी, जेएसडब्ल्यू स्टील, सेल, हिंडाल्को यांच्या समभागाच्या भावातही मोठय़ा प्रमाणात घसरण झाली होती. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 5 समभाग तेजीत होते. निफ्टीतील 50 पैकी 43 समभाग घसरणीसह बंद झाले होते.

सकाळी शेअर बाजार मुळातच घसरणीसह खुला झाला. सकाळी 381 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 58,634.69 तर निफ्टी 108 अंकांच्या घसरणीसह 17,443.85 अंकांवर खुला झाला होता. निफ्टीतील हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, डिव्हीस लॅब्ज, ओएनजीसी आणि एचसीएल टेक यांचे समभाग नफ्यासह बंद झाले.

इंडसइंड बँकेचे समभाग 3.50 टक्के इतके घसरले तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग 2.96 टक्के तेजीत होते. बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील समभागांनी बाजारावर दबाव बनवला होता. बीएसईवर 3 हजार 507 समभागांमध्ये व्यवहार झाला ज्यात 1 हजार 41 समभाग तेजीत होते. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 255 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते. 325 समभागांमध्ये अप्पर सर्कीट लागले होते तर 298 समभागांमध्ये लोअर सर्कीट लागले होते. अमेरिकेतील शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. डाओ जोन्स 0.40 टक्के घसरणीसह 34,584 वर तर नॅस्डॅक 0.91 टक्के घसरणीसह 15,044 अंकांवर बंद झाला होता.

Related Stories

दूरसंचार कंपन्याकडून ब्रॉडबँड सेवेत सवलती

tarunbharat

आयबीएम देणार 500 जणांना रोजगार

Patil_p

जेट एअरवेजच्या कर्जदारांची आज बैठक

tarunbharat

साखर उत्पादन 12 टक्क्मयांनी वाढणार ?

Patil_p

आयात घसरण चींतेचीच बाब

Omkar B

आर्म होल्डिंग्स कंपनीची निविडिया खरेदी करणार

Patil_p
error: Content is protected !!