तरुण भारत

अल्झायमर समजून घेताना…

21 सप्टेंबर हा दरवषी जागतिक अल्झायमर दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने अल्झायमर व डिमेंशिया यासारख्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यात येते. अल्झायमर हा डिमेंशिया या आजाराचा सर्वसामान्य प्रकार आहे. यामध्ये मेंदूविकार होण्यास सुरूवात होते व त्यामुळे स्मृतिभ्रंश तसेच विचार करण्याची क्षमता कमी होते.

मेंदूतील पेशी निकामी झाल्याने व्यक्तीच्या वागण्यात आणि शारीरिक हालचालींमध्ये फरक पडतो. या आजाराची सुरुवात जरी हळुवार झाली तरी कालांतराने हे गंभीर रूप धारण करते. अल्झायमर हा जास्त करून वृद्धांमध्ये आढळतो. यासाठी कुठलेही उपचार नसले तरी योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. भारतात वृद्धांची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता अल्झायमर किंवा डिमेंशिया असणाऱया वृद्धांना योग्य उपचारासाठी एका वेगळय़ा स्वतंत्र क्लिनिकची गरज आहे. याचाच विचार करून वृद्धांसाठी ‘मेमरी क्लिनिक’ ही संकल्पना सगळय़ाच जिह्यात महाराष्ट्र आरोग्य विभागाद्वारे सुरू करण्यात आली. वाढत्या आयुर्मानाबरोबर वयोवृद्धांच्या आरोग्याविषयीच्या समस्याही वाढत आहेत. जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, अल्झायमर इत्यादी. आज भारतात 4.1 दशलक्ष लोक अल्झायमर आजाराने ग्रस्त आहेत. असे असले तरीही स्मृतीभंश (अल्झायमर )हा एक आजार आहे. याची पुरेशी माहिती जनसामान्यापर्यंत पोहचली नसल्याने असे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. हे सांगण्यासाठी मी आज एक गोष्ट सांगणार आहे वयोवृद्ध पती पत्नीची.

Advertisements

माळ ओघळुन गेली। विखरून गेले मणी। ।

उरे फक्त दिवा। वात वळतो  दिव्याची ।।

मी श्री वासुदेव जोग आणि माझी पत्नी सौ वसुंधरा जोग यांची ही गोष्ट. आपल्या संसाराला सुरुवात झाली तेव्हाच्या या वस्तू अजूनपर्यंत वापरायचो आपण. मुलांच्या आग्रहाने पडली खूप साऱया नव्या सोयींची भर. पण काही वस्तू मात्र उरल्या गेलेल्या शतकाला पूरुन. कसा विलक्षण झपाटा असायचा तुझा. हा उरक होता म्हणून सासूला जिंकलस बाई. स्वतःची बाजू धरून ठेवायचीस पण चेहऱयावर मंद हसणं तेवत तेवत. त्यामुळे तू कधी चिडशील, भडकशील अशी अपेक्षा करणाऱयांचा हिरमोड व्हायचा. मी मात्र लवकर शिकलो. खरं म्हणजे जाणाऱया वर्षांमध्ये तुझ्यात मिसळत गेलो. कळायला लागलं मला तू बोलण्याआधी तुला काय हवे ते. म्हणता म्हणता चार दशके केली. मुला-मुलींच्या संसाराची सुंदर सकाळ आली. तिथेही होतीसच तु हौसेने सगळं करायला. आवडी पुरवायला कारण आता भर पडली ना नातवंडांची. प्रवास घडले, समारंभ होत राहिले तृप्तीचं जगणं होतं आपलं अगदी आता आतापर्यंत. पाच मिनिटांपूर्वीचे तपशील आठवेना तुला त्यावेळी आपण दोघेही कोडय़ात पडलो. वस्तू त्यांच्या पिढीच्या ठिकाणी बसेनात आता. उरक थोडा मंदावला होता की उत्साह थोडा, खंदावला कदाचित दोन्हीही तरीही म्हणायचीस मजेत आहे मी ! चंद्रबळ . . . चंद्रबळ आणि तुझाच शब्द !पण तिथेही कृष्णपक्ष सुरू झाला होता. आठवणींचा बहर कोमेजला, फांद्या सुकल्या  आणि आता अगदी बुंध्यापर्यंत. . . त्या दिवशी अगदी आवडत्या नातीचे नावही विसरलीस. . . जावई मुलासारखा होता तुला पण त्याला मुलगाच समजलीस. तेव्हा काळजात चर झालं. तरीही रेटत राहिलो. तुला सांभाळताना स्वतःलाही सांभाळणं ही मोठीच कसरत होती. शेवटी तो टप्पा आला तुझा सहवास जास्त महत्त्वाचा की तुझी काळजी घेणं? आणि घर तुझं . . . मी तुझा. . .पण काळजी नाही घेता येत तुझी मनासारखी. धावपळ, धडपड करायला ना. . नव्हती माझी, पण तू सुद्धा अस्वस्थ तुला वाटायचं मला जास्त कष्ट पडतात आणि मीही उदास तुझे निस्तेज होत जाणारे डोळे पाहत. काहीतरी करायला हवं! काही तरी करायला हवं! विचार करू लागलो आणि त्या रात्री तुझा तोल गेला आणि तू पडलिस तेव्हा ठरवल खूप झाली घराची माया, सहवासाची गोडी यापेक्षा उरलेल्या क्षणांना सोनेरी करणं महत्त्वाचं.

ज्या व्यक्तीला अल्झायमर आजार झाला आहे त्या व्यक्तीची परिस्थिती, त्यांची  क्षमता समजून घेणे आवश्यक आहे. पूर्ण नियोजन करून कुटुंबातील व्यक्ती मित्र यांनी त्यांच्यासाठी योजना करणे आवश्यक आहे. अल्झायमर आजार वाढत जातो. कुटुंबातील व्यक्तींनी, मित्राने त्या व्यक्तीला आधार द्यायला हवा. त्या व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी मदतीची आवश्यकता असू शकते. ज्या व्यक्तीला अल्झायमर झालेला आहे ती व्यक्ती आरोग्य, वित्तीय असुरक्षितता या गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहू शकते. यासाठी अल्झायमर झालेल्या व्यक्तींसाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र तसेच इतर काळजी घेणाऱया व्यक्तींनी कल्याणकारी भूमिका बजावल्यास व्यक्तीची कार्यक्षमता अधिक वाढविण्यास मदत होऊ शकते .

अल्झायमर या आजाराची लक्षणे . ..

? विसर पडणे

? वारंवार त्याच गोष्टी विचारणे

? दैनंदिन कामकाज करण्यास वेळ लागणे त्यात चुका होणे.                                    

? एकटे बसणे, बोलणे कमी होणे

? विचारांची जुळवाजुळव करण्यात अडचण

? अचानक भाव स्थितीत बदल होणे, चिडचिड होणे

? रस्ता हरवणे

? स्थळकाळाचे भान न राहणे

? शेवटी स्वतःची देखभाल करणेही अवघड होणे.

? वाढत्या वयाबरोबर या आजाराची शक्मयता वाढते. त्यामुळे त्यांच्या या आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते.

 औषधोपचार  उपचार. ..

? अल्झायमर हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही.

? उत्तरोत्तर रुग्णाची परिस्थिती खालावत जाते. परंतु उपलब्ध औषधोपचाराने आपण बौद्धिक क्षमतांच्या ऱहासाचा वेग काही प्रमाणात थांबवू शकतो. स्मृतिभ्रंशाच्या  काही भावनिक लक्षणांवर (उदा. चिडचिडेपणा,भास,भ्रम, अस्वस्थता उदासिनता इत्यादी) उपचार होऊ शकतो व त्यामुळे रुग्णांना सांभाळण्यास मदत होऊ शकते.

अल्झायमर व्यक्तींशी संवाद साधताना…

स्मृतीभ्रंश असणाऱया व्यक्तींशी संवाद साधणे कौशल्याचे काम आहे. या आजारात रुग्णाच्या स्मरणशक्ती, विचार करणे, शब्दांची जुळवाजुळव करणे, रचना करणे यावर गदा येऊ शकते. त्याचबरोबर रुग्णांची ऐकण्याची क्षमता कमी झाल्याने त्याच्याशी संवाद साधणे थोडे अवघड होऊ शकते अशावेळी खालील गोष्टींचा अवलंब करावा.

? सोपे शब्द व छोटय़ा वाक्मयरचनेचा वापर करा

? हळूहळू व स्पष्ट बोला.

? स्पर्श व हावभावांचा संवादासाठी वापर करा.

? शांत व संयमी रहा.

? खूप प्रश्न विचारू नका. शक्मय तिथे विचारण्याऐवजी माहिती द्या.

? रुग्णांना लहान मुलासारखे वागवु नका/ बोलू नका.

? रुग्णांना रुग्णांचे म्हणणे ऐकण्यास पुरेसा वेळ द्या .

? त्यांना छान जगण्यास प्रोत्साहन द्या.

Related Stories

शिवशाहीरांचे शतक

Amit Kulkarni

सहकाराशी सहकार्य योग्य ठरले असते

Patil_p

सातव्यांदा सत्ताफळ!

Patil_p

आणि रावळगाव

Patil_p

चीनची नव्या दिशेने वाटचाल

Patil_p

शिक्षण संस्थांची राष्ट्रीय क्रमवारीः एक पाऊल पुढे

Patil_p
error: Content is protected !!