तरुण भारत

मी तू पणाची झाली बोळवण

अध्याय अकरावा

ज्याप्रमाणे एकुलते एकच मूल असले म्हणजे ते आईला अधिक आवडते, त्याप्रमाणे प्रेमळ भक्तांचे कौतुक करणे ह्यातच भगवंतांना अत्यंत सुख वाटते. ह्याकरिता प्रेमळ भक्तांना ते तत्काळ त्यांच्या आश्रयाखाली घेतात, आणखी वर त्याना आत्मसुख देतात. ते त्यानी न घेतल्यास शेवटी ते त्यांचा चाकर होतात. अत्यंत प्रेमाने ज्याने त्याची चित्तवृत्ति भगवंताना अर्पण केली, त्याची सेवा करण्याचा निश्चित विचार ते लगेच करतात. प्रेमळ भक्तांचे उच्छिष्ट खाताना किंवा त्यांची घोडी धुताना त्यांना काहीही लाज वाटत नाही. फार काय सांगावे ? पण त्यांच्या घरची उष्टी काढताना सुद्धा भगवंत मुळीच लाजत नाहीत. प्रेमळ भक्तांची भगवंतांना इतकी आवड आहे की, त्यांचे जोडेसुद्धा ते मस्तकावर घेतात. भगवंतांचे हे मनोगत त्यांचंच रूप असलेले संत जाणून असतात. संतांचे अभंग हे ईश्वराचं मनोगतच असतं. संत अमृतराय महाराज हे ईश्वराचं वर दिलेलं मनोगत त्यांच्या अभंगातून मांडतात ते याप्रमाणे,

Advertisements

भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी, सोडली मी लाज रे ।।1।। धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे । घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ।।2।।वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे । खाता भिल्लीणीची बोरे, उच्छि÷ाची चोज रे ।।3।। दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो । आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्‌®ााr पेज रे ।।4।। पुर्णब्रह्म ह्मणती माते, पुर्णब्रह्म मीच त्याते । ऐसी याची जाणीव ते, ह्मणे अमृतराय रे ।।5।।

उद्धवाला प्रेमळांची गोष्ट सांगता सांगता श्रीकृष्णालाही प्रेमाचे भरते आले. त्याचा कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने धावून उद्धवास आलिंगन दिले. श्रीकृष्णाचे प्रेमच असे अद्?भुत होते ! डोळे अश्रृंनी भरून आले आणि ते स्वानंदजीवनाचा वर्षाव करू लागले. जणू काय श्रीकृष्ण त्या अश्रूंनी उद्धवाला भक्तीच्या साम्राज्याचा पट्टाभिषेकच करीत होता. ओघानुसार प्रेमळ भक्ताची गोष्ट सांगता सांगता डोळय़ांसमोर उद्धव पाहिला, तेव्हा श्रीकृष्णाने एकदम धावून जाऊन त्याला मिठी घातली. श्रीकृष्णाला भक्तांची भारी आवड. आवडीने आलिंगन दिले तेव्हा श्रीकृष्ण कार्यकारणसुद्धा विसरला, निजधामाला जाण्याचे विस्मरण झाले आणि मीतूपणाही आठवला नाही. आपण देव व उद्धव आपला भक्त आहे अशी भेदभावाची आठवणच नाहीशी झाली. कथानिरूपण करावयाचीही आठवण राहिली नाही. उद्धवाला उद्धवपण आठवेनासे झाले आणि कृष्णाला कृष्णपणही आठवले नाही अशी स्थिति झाली. प्रेमळाची गोष्ट सांगताना परात्पराच्या पलीकडे दोघांची ऐक्मयामुळे मिठी पडली. प्रेमाची आवड फार मोठी आहे ! भक्तीचे खरे खरे सुख काय ते उद्धवाला आज प्राप्त झाले.

भक्तीचे जे अलौकिक प्रेम म्हणून असते, तेच उद्धवाने या वेळी व्यक्त करून दाखविले. श्रीकृष्ण निजधामाला जाताना उद्धवाने जर हे विचारले नसते, तर श्रीकृष्णांनी ज्ञान, वैराग्य व भक्ति यांची कथा कशाला सांगितली असती? खरोखर भक्तिप्रेम विशेष असते हे उद्धवाने सहज उघड केले. उद्धवाच्या त्या प्रश्नानेच श्रीमद्?भागवत त्रिभुवनात पूज्य होऊन राहिले आहे. उद्धवाची स्तुति करायची म्हणून भगवंतांनी तन, मन व प्राण यांनी उद्धवाला मोठय़ा जिव्हाळय़ाने ओवाळणी केली. यावरून उद्धवाची योग्यता लक्षात येते. जे शब्दातून सहज सांगता येण्यासारखे नाही, बुद्धीलाही जे आकलन होण्यासारखे नाही, ते भक्तीच्या प्रेमातील आत्मगुह्य उद्धवाला देण्याकरिता श्रीकृष्णांनी आलिंगनाचे केवळ निमित्त केले. तो पुरुषोत्तम भक्तीचे शुद्ध व अतिउत्तम प्रेम उद्धवाला देता झाला व त्यामुळे तो मेघश्याम श्रीकृष्ण आनंदित झाला. नाथबाबा म्हणतात प्रेमळांची गोष्ट सांगता सांगता, श्लोकाच्या अर्थाचाही मला विसर पडला. कृष्णालाही प्रेमाची कथा आवडली, म्हणून ती आवरता आवरेना. प्रेमाचा स्वभाव असाच आहे की, तो आठवणीची आठवण होऊ देत नाही. ही गोष्ट सज्जनांना माहीतच आहे कारण ते भक्तिप्रेमाला जाणतात.

क्रमशः

Related Stories

तरी असेल गीत हे…

Patil_p

तिसरा गुरु आकाश

Patil_p

नैतिक पराभव

Omkar B

मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे

Patil_p

इम्युनिटी

Patil_p

काय आले, काय गेले (1)

Patil_p
error: Content is protected !!