तरुण भारत

ऑस्ट्रेलियात आहे बोलणारे बदक

माणूस बोलतो तसे काही शब्द पोपट बोलू शकतो, हे आपल्याला माहिती असते. अनेक पोपट माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतात. तथापि, सध्या ऑस्ट्रेलियात बोलणाऱया बदकांनी चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. मस्क जातीचे हे बदक अनेक इंग्रजी शब्दांचा थेट माणसांसारखाच उच्चार करू शकते. तसेच इतरही अनेक चित्रविचित्र आवाज काढू शकते. समागमाच्या वेळी या बदकाने आपल्या जोडीदाराला ‘यु ब्लडी फूल’ असे म्हटलेले ऐकल्याचे अनेक जण सांगतात. त्याचे हे शब्द ध्वनीमुद्रित करण्यात आलेले आहेत. लंडन येथील फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन ऑफ द रॉयल सोसायटी या संस्थेच्या अहवालानुसार ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील टिडबिनबिला नॅचरल रिझर्व्ह येथे हे बोलणारे बदक पहावयास मिळालेले आहे. या बदकाचे नाव रिपर असे ठेवण्यात आले असून ते अनेकदा यु ब्लडी फूल या शब्दांचा उच्चार करताना दिसून आले आहे.

हे बदक दरवाजा बंद केल्याचा आवाजही आपल्या तोंडातून काढू शकते. माणसाच्या भाषेची नक्कल बदकाने केल्याचे यापूर्वी कधी पाहण्यात आलेले नाही, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. बदक आणि हंस यांना मानवी बोली शिकविण्याचे अनेक प्रयत्न वाया गेले आहेत. बदकाच्या स्वरयंत्रात मानवी शब्द उच्चारण्याची क्षमताच असत नाही, अशी आजवरची समजूत होती. तथापि, या मस्क जातीच्या बदकाने ती खोटी ठरविली आहे. हमिंगबर्ड, युरोपियन स्टर्लिंग किंवा मैना असे पक्षी मानवी बोलीची नक्कल करू शकतात. त्यांना तशा प्रकारे प्रशिक्षण दिल्यास ते काही शब्द उच्चारू शकतात. पण बदकांच्या बाबतीत आजवर असे घडलेले नव्हते. मात्र, आता ही संकल्पना बदलावी लागणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.

Advertisements

Related Stories

लांब केसांमुळे पोहोचला तुरुंगात

Patil_p

पेंटागॉननजीक बेछूट गोळीबार, अधिकाऱयाचा मृत्यू

Patil_p

काबूलमध्ये तालिबान-पाक विरोधी निदर्शने

Patil_p

…अशी आहे ब्राझीलमध्ये कोरोनाची सद्यस्थिती

datta jadhav

म्यानमारमध्ये लष्कराच्या गोळीबारात 18 आंदोलकांचा मृत्यू

datta jadhav

चीनने सत्य दडविल्याने जगात महामारी

Patil_p
error: Content is protected !!