तरुण भारत

बसवण्यासाठी 200 कोटी, हटविण्यासाठी 150 कोटी

इतिहासकाळात गाजलेल्या एका योद्धय़ाचा पुतळा बनविण्यासाठी आणि त्याची स्थापना करण्यासाठी चीनमध्ये 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 78 फूट उंचीचा हा पुतळा असून त्याची स्थापना करण्यासाठी बऱयाच प्रयत्नांती प्रशासनाची संमती मिळाली होती. हा पुतळा आणि त्याची स्थापना करण्यात आलेला चबुतरा यांची मिळून उंची 190 फूट होती. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर ती दुसरीकडे हलवावी, असा सरकारी आदेश निघाला. त्यामुळे पुतळा त्याच्या मूळ जागेपासून हटविण्यासाठी आणखी 150 कोटी रुपये खर्च करावे लागले. या सर्व प्रकारात फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. एवढा महाग पुतळा स्थापन केल्यानंतर त्याला हटविण्याचा आदेश निघणे ही जगातील एकमेव घटना असल्याचे बोलले जात आहे.

ज्या ठिकाणी हा पुतळा बसविण्यात आला, तेथे 78 फुटापेक्षा अधिक उंचीचे पुतळे किंवा इमारती उभारण्यास मनाई होती. पुतळा स्थापन करताना ही बाब लक्षात घेतली गेली नाही. त्यामुळे तो हटविण्याची वेळ आली. या ठिकाणी असा पुतळा उभा करण्यास मुळात अनुमती कशी देण्यात आली? हा प्रश्न आता विचारला जात असून चीनच्या सरकारने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. हा पुतळा आता मूळ जागेपासून आठ किलोमीटर अंतरावर पुन्हा स्थापन करण्यात येणार आहे.

Advertisements

Related Stories

जगातील 7.70 लाख लोकांनी पहिली ऑनलाईन ‘पेंग्विन‌ परेड’

Rohan_P

अमेरिकेत 20 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

केवळ मास्कद्वारे तयार केला वेडिंग ड्रेस

Patil_p

पुढील 6 महिने निर्णायक

Patil_p

असा आहे इम्रानचा ‘नया’ पाकिस्तान

Patil_p

तहव्वूर राणाच्या सुटकेला अमेरिकेचा विरोध

datta jadhav
error: Content is protected !!