तरुण भारत

चालता फिरता कोल्डस्टोरेज

उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका कृषी उत्पादन संघटनेने छोटय़ा शेतकऱयांना साहाय्यभूत ठरेल, असा चालता फिरता कोल्डस्टोअर शोधून काढला आहे. नुकतेच याचे प्रदर्शन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर करण्यात आले आहे. या कोल्डस्टोअरमुळे छोटय़ा शेतकऱयांना त्यांची उत्पादने टिकविणे आणि योग्य वेळी ती बाजारात आणणे शक्मय होणार आहे. या कोल्डस्टोअर सिस्टिमचे वैशिष्टय़ असे, की शेतकऱयाला आपली उत्पादने स्टोअरपर्यंत घेऊन जावी लागत नाहीत. उलट हा स्टोअरच शेतापर्यंत येतो. त्यामुळे शेतकऱयाचा वाहतुकीचा त्रास वाचतो. मोबाईलवरून कॉल देऊन शेतकरी हा स्टोअर शेतावर मागवून घेऊ शकतात. त्यामुळे कोल्डस्टोअरमध्ये जागा मिळाली नाही, ही समस्या उद्भवत नाही. या स्टोअरमध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या नाशवंत भाज्या, फळे, फुले इत्यादी कृषी उत्पादने तीन महिन्यांपर्यंत ताजी राहू शकतात. या स्टोअरची वाहतूक ट्रक्टरद्वारे केली जाते. त्यामुळे तो कोणत्याही दुर्गम ठिकाणी नेणेही शक्मय होत आहे. शीततापमान राखण्यासाठी कॉम्प्रेसरचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच तो विजेवरही चालू शकतो. एका स्टोअरची क्षमता दोन क्विंटल इतकी असून त्याचा उपयोग करण्याचा खर्चही मर्यादित असल्याचे सांगितले गेले आहे. या स्टोअरचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याची योजना आता उत्तर प्रदेश सरकारने आखली असून भविष्यकाळात हा एक नवा क्यवसाय म्हणून पुढे येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

Related Stories

इराणमधील 58 भारतीयांना घेऊन हवाईदलाचे सी-17 भारतात दाखल

tarunbharat

मध्यप्रदेश : बस दुर्घटनेत 46 प्रवाशांचा मृत्यू

datta jadhav

पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरीपार

Patil_p

उत्तराखंड : मागील 24 तासात 5,541 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

हरियाणाकडून दिल्ली सीमारेषा खुली

Patil_p

आधारभूत किमतीला हात लावणार नाही!

Patil_p
error: Content is protected !!