तरुण भारत

तालिबानकडून महिलांवर कठोर निर्बंध

लक्षावधी युवतींची रस्त्यावर उतरुन निदर्शने, जागतिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया

काबूल / वृत्तसंस्था

Advertisements

इस्लाम धर्माच्या तत्वांनुसार महिलांना स्वातंत्र्य दिले जाईल, असे आश्वासन आजपर्यंत देणाऱया तालिबानने अफगाणिस्तानात महिलांवर पुन्हा कठोर निर्बंध लागू केल्याने जगभरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सोमवारी लक्षावधी महिला, शालेय मुली आणि युवतींनी रस्त्यावर उतरुन या निर्बंधांविरोधात निदर्शने केली.

या देशात तालिबान सत्तेवर येऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता तालिबान पुन्हा त्याच्या मूळ धर्मांध धोरणांकडे परत जाताना दिसत आहे. नवे तालिबान 1996 च्या तालिबानपेक्षा सौम्य आणि सर्वसमावेशक असेल असे आश्वासन या संघटनेकडून सत्तेवर आल्यानंतर दिले गेले होते. तथापि, आता या आश्वासनाची खुलेआम पायमल्ली होत असल्याचा अनुभव येत आहे.

महिलांच्या कामांवर निर्बंध

महिलांनी घराबाहेर पडून काम करण्यावर कठोर निर्बंध घातले गेल्याची घोषणा तालिबानने नुकतीच केली. हे निर्बंध अशा स्वरुपाचे आहेत, की महिलांना घराबाहेर काम करणे अशक्य होत आहे. सर्व बाजूंनी महिलांच्या स्वातंत्र्यांवर घाला घालण्याचे काम तालिबान टप्प्याटप्प्याने करीत आहे. सरकारी नोकऱया तसेच नगरपालिकांच्या विविध खात्यांमधून महिलांना कमी करुन त्यांची कामे पुरुषांना देण्यात येत आहेत. यामुळे हजारो महिलांना नोकऱया गमवाव्या लागल्या.

शिक्षकांना कामावर येण्याचा आदेश

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पुरुष शिक्षकांनी कामावर उपस्थित व्हावे, असा आदेश अफगाणिस्तानच्या शिक्षण विभागाने गेल्या शनिवारी काढला. तथापि, याच शाळांमध्ये शिक्षिका असणाऱया हजारो महिलांना मात्र कामावर येण्याचा आदेश काढण्यात आला नाही. त्यामुळे त्या घरातच बसून आहेत. त्यांची कामे आता पुरुष शिक्षकांना दिली जातील आणि शिक्षिकांवर घरातच बसून राहण्याची वेळ येईल, अशी भीती तेथील महिलांना वाटत आहे. केंद्रीय सरकार, तसेच प्रांतीय प्रशासनांच्या सर्वच विभागांमधून महिलांना कमी करुन त्यांच्या जागा पुरुषांना देण्याची पद्धतशीर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे पहावयास मिळते.

गुप्तपणे कारस्थाने

महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल अशी धोरणे जरी स्पष्टपणे घोषित करण्यात आली नसली, तरी गुप्तपणे तशा योजना आखल्या जात आहेत. जगाच्या डोळय़ात धूळफेक करण्यासाठी तालिबान उघड घोषणा करुन महिलांच्या स्वातंत्र्याचा लोप करत नाही. तथापि महिलांना कामच करता येऊ नये अशी स्थिती निर्माण करुन त्यांनी स्वतःच नोकऱया सोडाव्यात अशी तालिबानची इच्छा आहे, असा आरोप अनेक महिलांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर केला.  

20 वर्षांमध्ये प्रगती

जगातील इतर लोकशाहीवादी देशांच्या मानाने अफगाणिस्तानातील महिलांना स्वातंत्र्य बरेच कमी आहे. तथापि 2001 पासून तालिबाची राजवट गेल्यानंतर त्यांना मोकळा श्वास घेता येणे शक्य झाले होते. शिक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासकीय सेवा, बँका आणि इतर वित्तसंस्थांमध्ये त्यांना नोकऱया दिल्या गेल्या. त्यामुळे त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याची सवय लागली. तथापि, आता घडय़ाळाचे काटे मागे फिरविण्याचा प्रयत्न नव्या राजवटीकडून केला जात आहे. त्यामुळे महिलांची अवस्था जिवंत प्रेतांसारखी झाली, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे.  

महिलांचा लढा सुरुच

ड तालिबानच्या जुलमी राजवटीविरोधात महिला पुन्हा आक्रमक

ड महिलांच्या स्वातंत्र्यावर पद्धतशीर घाला घालण्याचे काम सुरु

ड नोकऱयांमधून महिलांची संख्या कमी करण्याचे सरकारी प्रयत्न

Related Stories

93 वर्षीय मेरीला मिळाला नवा जोडीदार

Patil_p

रशियात बाधितांची संख्या 9 लाखासमीप

Patil_p

भारतीय वंशाच्या दोघांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी कौन्सिलमध्ये समावेश

datta jadhav

पाकिस्तानमध्ये 40 टक्के वैमानिकांकडे बोगस परवाने

datta jadhav

अमेरिका : सिनसिनाटी शहरात गोळीबार; 8 ठार

datta jadhav

गिलगिट-बाल्टिस्तानला नव्या प्रांताचा दर्जा ?

Patil_p
error: Content is protected !!