तरुण भारत

भाजपकडून ‘अब्बाजान’ व्यंगचित्राच्या साहाय्याने शरसंधान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण आता तापण्यास प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी भाजप आणि त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी समाजवादी पक्ष सध्या पोस्टर वॉरमध्ये गुंतले आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांचा उल्लेख ‘अब्बाजान’ असा केला होता. यावर कथित विचावंतांनी बराच गदारोळ उठविला होता. तथापि भाजपने आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाला खिजविण्यासाठी आता याच संकल्पनेचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या शब्दाचा उपयोग असलेली पोस्टर्स छापून ते राज्यभर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक येत्या मार्च महिन्यात होत आहे. मात्र प्रचाराचा अनधिकृत प्रारंभ या आधीच झाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून सत्ताधारी आणि विरोधक सहा महिने आधीच निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. भाजपच्या या पोस्टरमध्ये अखिलेश यादव, मुलायमसिंग यादव आणि एआयएमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. समाजवादी पक्षाने या पोस्टरवर टीका केली असून यातून भाजच्या जातीय आणि धर्मद्वेषी चेहरा समोर येतो अशी टिप्पणी केली.

ही निवडणूक भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यासाठी अत्याधिक महत्वाची असून भाजप सत्ता टिकविण्यात यशस्वी होणार का, हा मुख्य प्रश्न आहे. भाजपला गेल्या निवडणुकीत स्वबळावर 312 तर मित्रपक्षांसह 325 जागा मिळाल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला केवळ 48 जागांवर समाधान मानावे लागले होते. बहुजन समाज पक्ष आणि काँगेस यांचा अक्षरशः धुव्वा उडाला होता.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

दिल्लीमध्ये कोरोनाचे 4,127 नवे रुग्ण; 30 जणांचा मृत्यू

Rohan_P

भारत-अमेरिका करणार एकत्र नौदल सराव

Patil_p

सुरतमध्ये मिळतोय ‘कुल्हड पिझ्झा’

Patil_p

‘तौत्के’ चक्रीवादळ होणार आणखी तीव्र

datta jadhav

५० टक्के आरक्षण मर्यादा हटवावी : सुप्रिया सुळे

triratna
error: Content is protected !!