तरुण भारत

रशियन विद्यापीठातील गोळीबारात 8 जण ठार

हल्लेखोर ताब्यात – जखमी झाल्यामुळे उपचार सुरू

मॉस्को / वृत्तसंस्था

Advertisements

रशियामध्ये परम शहरातील एका विद्यापीठात झालेल्या गोळीबारात जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात घबराट पसरताच जीव वाचविण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी बहुमजली इमारतीवरून उडय़ा मारल्या. यावेळीही काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. मात्र याविषयी स्पष्ट माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोर याच विद्यापीठातील माजी विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेताना तो जखमी झाला असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे. दरम्यान, रशियात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनंतर विद्यापीठातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती भारतीय दुतावासाने जारी केली आहे. तसेच मृत व जखमींमध्येही कोणीही भारतीय विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मॉस्कोपासून पूर्व दिशेला 1300 किलोमीटर अंतरावर परम स्टेट युनिव्हर्सिटी आहे. या विद्यापीठाच्या आवारात स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 11 वाजता एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाली. त्यानंतर काही वेळातच त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हा हल्ला सुरू असताना काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वतःला एका इमारतीत बंद करून घेतल्यामुळे त्यांचा जीव बचावला. याचदरम्यान बचावासाठी काही जणांनी खिडकीतून खाली उडय़ा टाकल्या. यासंबंधीचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बंदुकधाऱयाला ताब्यात घेतले. सदर हल्लेखोर विद्यापीठाचाच माजी विद्यार्थी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर विद्यापीठ कॅम्पसमध्ये विशेष शोधमोहीमही राबविण्यात आली. मात्र, अन्य कोणीही संशयित सापडला नाही.

Related Stories

कोरोनाचा शिक्षणावर प्रतिकूल परिणाम

Patil_p

फ्रान्समध्ये संसर्ग गतिमान

Patil_p

युक्रेन : अध्यक्ष बाधित

Omkar B

नव्या महामारीचा धोका

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 85 लाखांचा टप्पा

datta jadhav

रशियाची पहिली लस सर्वसामान्यांसाठी खुली

datta jadhav
error: Content is protected !!