तरुण भारत

पुढील महिन्यापासून लसींची निर्यात

अतिरिक्त लसी विदेशात पाठविणार – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारत पुढील महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसींची परदेशात निर्यात सुरू करेल, अशी घोषणा सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केली. ऑक्टोबर महिन्यापासून वैद्यकीय कंपन्यांकडून लसपुरवठा मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने आता निर्यातीवर भर देण्यात येणार आहे. मात्र, देशाची गरज पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त लस निर्यात केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

देशात आता लसीकरणाने वेग पकडला असून या मोहिमेला योग्य प्रतिसाद मिळत आहे. लसींचा पुरवठा आणि लाभार्थी यांच्यातील संतुलनामुळे लसीकरण मोहिमेने सध्या वेग घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या विशेष लसीकरण मोहिमेवेळी दिवसभरात अडीच कोटींहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. तत्पूर्वी गेल्या आठवडय़ापासूनच दिवसाला साधारणपणे एक कोटी डोस दिले जात असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

सप्टेंबरमध्ये भारत सरकारला भारतीय कंपन्यांनी तयार केलेले 26 कोटी लसीचे डोस मिळाले. लसीकरणाचे कामही सातत्याने वाढत आहे. पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये आणखी 30 कोटींपेक्षा जास्त डोस मिळण्याची शक्मयता आहे. त्यानंतरही उत्पादन आणखी वाढेल. त्याच अनुषंगाने अतिरिक्त लसींची विदेशात निर्यात करून ‘लस मैत्री’ कार्यक्रम बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत ‘लस मैत्री’ अंतर्गत जगाला मदत करणार आहे. पुढील तीन महिन्यांत 100 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध होतील. आतापर्यंत देशात 81 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. या 81 कोटींपैकी अखेरचे 10 कोटी डोस देण्याला फक्त 11 दिवस लागले. एकंदर भारताने नागरिकांच्या लसीकरण मोहिमेत आघाडी घेतली आहे, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. भारतीयांची गरज पूर्ण झाल्यानंतरच  निर्यात मोहीम तीव्र केली जाणार असून त्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘कोव्हॅक्स’ची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोविड-19 विरुद्ध सामूहिक लढाईसाठी जगाशी भारताची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचेही ते पुढे म्हणाले.

लस संशोधनात भारताची मोठी झेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळेच भारत एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कोविड लसींचे संशोधन आणि उत्पादन करत आहे. भारताची लसीकरण मोहीम जगासाठी एक आदर्श आहे आणि ती खूप वेगाने प्रगती करत आहे. एकंदर भारताने कोरोनाकाळात मोठे यश मिळविलेले असून भारतातील कोविड लसींचे स्वदेशी संशोधन आणि उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे मांडविया म्हणाले.

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱयापूर्वी… पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱयावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या विदेश दौऱयापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी ही घोषणा केली. मोदींच्या विदेश दौऱयादरम्यान हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्याचा भारताला मोठा लाभ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा उंचावली जाणार आहे

Related Stories

‘बर्ड फ्लू’मुळे देशात पहिला मृत्यू

datta jadhav

Parliament Monsoon Session: कोरोना विरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे – पीएम नरेंद्र मोदी

triratna

फेसबुकप्रकरणी लष्कराला दिलासा नाही

datta jadhav

धक्कादायक! बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Rohan_P

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

triratna

कोरोना लसीची कमाल, अन्य आजारही झाले बरे

Patil_p
error: Content is protected !!