तरुण भारत

राजस्थान-पंजाब आज चुरशीचा सामना

वृत्तसंस्था/ दुबई

2021 च्या आयपीएल क्रिकेट हंगामातील दुसऱया टप्प्याला दुबईत रविवारपासून प्रारंभ झाला. आता राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना मंगळवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील आक्रमक फटकेबाजी पाहण्याची संधी शौकिनांना लाभणार आहे.

Advertisements

राजस्थान रॉयल्स संघातील लिंव्हीगस्टोन आणि लुईस त्याचप्रमाणे पंजाब संघातील ख्रिस गेल आणि कर्णधार के.एल. राहुल यांच्या आक्रमक फटकेबाजीचे दर्शन अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात राजस्थान आणि पंजाब हे दोन्ही  संघ  आपले नशीब बदलण्यासाठी झगडतील आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 हंगामामध्ये या दोन्ही संघांनी आपले प्रशिक्षक आणि कर्णधार बदलून संघाला स्थिरता मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आयपीएल स्पर्धेत कर्णधार राहुलच्या फलंदाजीमध्ये सातत्य दिसून आले असून त्याने बऱयाच धावा जमविल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व सॅमसन करीत आहे. लिंव्हिगस्टोन, लुईस, मिलर, सॅमसन यांच्यावर फलंदाजीची भिस्त राहील. उनादकट, कुलदीप यादव, श्रेयस गोपाल, मार्कंडे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.

के.एल. राहुल, अगरवाल, ख्रिस गेल यांच्यावर पंजाबच्या फलंदाजीची भिस्त राहणार आहे. मोहम्मद शमी, मार्करम, आदिल रशीद, हेन्रीक्स आणि जॉर्डन हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.

Related Stories

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन तंदुरूस्त

Patil_p

न्यूझीलंडच्या बार्कले यांना भारताचा पाठिंबा?

Patil_p

आयपीएल 2020 : हैदराबादला धक्का देत दिल्लीची अंतिम फेरित धडक

triratna

प्राग्वे टेनिस स्पर्धेत क्विटोव्हा खेळणार

Patil_p

न्यूझीलंड हॉकी संघाचा भारतात खेळण्यास नकार

Patil_p

विराटने घरी बसून कमावले 3 कोटी 60 लाख!

Patil_p
error: Content is protected !!