तरुण भारत

मानांकनात जपानच्या ओसाकाची घसरण

वृत्तसंस्था/ पॅरीस

डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या सोमवारी घोषित करण्यात आलेल्या मानांकन यादीत जपानच्या नाओमी ओसाकाची घसरण झाली असून तिला पहिल्या पाच टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्याचप्रमाणे रूमानियाची माजी टॉप सीडेड हॅलेपच्या मानांकनातही घसरण झाली असून ती आता 14 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बार्टी पहिल्या स्थानावर आहे.

Advertisements

महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 10075 मानांकन गुणांसह पहिल्या, बेलारूसची सॅबेलिनेका 7720 गुणांसह दुसऱया, झेकची प्लिसकोव्हा 5315 गुणांसह तिसऱया, युक्रेनची स्विटोलिना 4860 गुणांसह चौथ्या,  झेकची क्रेसीकोव्हा 4668 गुणांसह पाचव्या, पोलंडची स्वायटेक 4571 गुणांसह सहाव्या, अमेरिकेची केनिन 4413 गुणांसह सातव्या, जपानची ओसाका 4326 गुणांसह आठव्या, स्पेनची मुगुरूझा 4135 गुणांसह नवव्या, झेकची क्विटोव्हा 4060 गुणांसह दहाव्या, स्वीसची बेनसिक 3820 गुणांसह 11 व्या, ग्रीकची साकेरी 3750 गुणांसह 12 व्या, रशियाची पॅव्हेलचेंकोव्हा 3285 गुणांसह 13 व्या आणि रूमानियाची हॅलेप 3152 गुणांसह 14 व्या स्थानावर आहे.

Related Stories

पंजाबविरुद्ध आज चेन्नई सुपरकिंग्जला विजयाची गरज

Patil_p

लंडन मॅरेथॉनमध्ये जेपकोसगेई, लिमा विजेते

Patil_p

यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

Patil_p

मायभूमीत परतल्याचा आनंद वेगळा

Patil_p

भारतातील विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा पीसीबीचा इशारा

Patil_p

ग्रॅण्डमास्टर गुकेश उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!