तरुण भारत

अर्जेंटिनाचा बेलारूसवर विजय

वृत्तसंस्था/ ब्यूनोस आयरीस

अर्जेन्टिनाने बेलारुसवर विजय मिळवित पुढील वर्षीच्या डेव्हिस चषक पात्रता फेरीत स्थान मिळविले. शनिवारच्या एकेरीत ज्युनियर खेळाडूकडून पराभूत झालेल्या दिएगो श्वार्ट्झमनने रविवारी परतीच्या एकेरीत बेलारुसच्या अलेक्झांडर झॅगिरोवस्कीचा 6-1, 6-2 असा फडशा पाडत अर्जेन्टिनाला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून देत पुढील फेरीतील स्थानही निश्चित केले. त्याआधी शनिवारी दुहेरीचा सामना जिंकून अर्जेन्टिनाने बेलारुसवर 2-1 अशी आघाडी घेतली होती. श्वार्ट्झमनने आवश्यक असलेला एक गुण मिळवित संघाला विजयी केले.

Advertisements

शनिवारी या लढतीतील सलामीच्या एकेरी सामन्यात बेलारूसच्या डॅनिल ओस्टापेंकोव्हने शुवार्त्झंमनला पराभूत करून अनपेक्षित धक्का दिला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या दुसऱया एकेरी सामन्यात शुवार्त्झंमनने बेलारूसच्या झिगेरोव्हेस्कायचा 6-1, 6-2 असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्याचप्रमाणे दुहेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या झेबालोस आणि गोंझालेजने बेलारूसच्या ओस्टापेंकोव्ह आणि ऍरूटीयुनेनचा 5-7, 6-2, 6-2 असा पराभव केला.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत हॉलंडने विश्व गट-1 मधील लढतीत उरूग्वेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. तसेच ब्राझीलने लेबेनॉनवर विजय मिळवीत पुढील फेरीत गाठली आहे.

Related Stories

महिला हॉकी संघाचा पराभव झाल्याने वंदना कटारियाच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ; घराबाहेर फोडले फटाके

triratna

विंडीज संघाला न्यूझीलंडमध्ये सराव करण्यास परवानगी

Patil_p

मनु भाकरच्या प्रशिक्षण केंद्रात बदल

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा लंकेवर डावाने विजय

Patil_p

विम्बल्डन स्पर्धेपर्यंत डब्ल्यूटीएचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!