तरुण भारत

झिंबाब्वेचा स्कॉटलंडवर मालिका विजय

वृत्तसंस्था/ एडिनबर्ग

मिल्टन शुंभाच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर रविवारी झिंबाब्वे संघाने टी-20 मालिकेतील सामन्यात स्कॉटलंडचा 6 गडय़ांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 20 षटकांत 4 बाद 177 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 19.1 षटकांत 4 बाद 180 धावा जमवीत हा सामना 5 चेंडू बाकी ठेवून 10 गडय़ांनी जिंकला. झिंबाब्वेने ही मालिका 2-1 अशी हस्तगत केली.

स्कॉटलंडच्या डावामध्ये सलामीच्या मुनसेने 30 चेंडूत 54, बेरिंग्टनने 39 चेंडूत 44, मॅकलोडने 29 चेंडूत नाबाद 39 आणि लिसेकने 5 चेंडूत 17 धावा जमविल्या. टी-20 प्रकारात स्कॉटलंडच्या मुनसेने 1000 धावांचा टप्पा ओलांडला. झिंबाब्वेतर्फे जाँग्वेने 2 तर चेतरा आणि निगेरेव्हा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेच्या डावात शुंभाने आक्रमक फटकेबाजी करताना 29 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 66 धावा झळकविल्या. चेकाबेव्हा आणि कर्णधार एर्वीन यांनी सलामीच्या गडय़ासाठी 60 धावांची भागिदारी केली. चेकाबेव्हाने 26 चेंडूत 25 तर एर्वीन 23 चेंडूत 25 धावा जमविल्या. मधवेरेने 31 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. स्कॉटलंडतर्फे इन्हान्सने 1 तर लिसेकने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड 20 षटकांत 4 बाद 177, झिंबाब्वे 19.1 षटकांत 4 बाद 180.

Related Stories

ऍटलांटा स्पर्धेत जॉन इस्नेर विजेता

Patil_p

महिला टेनिसपटू मॅडिसन कीज कोरोनाबाधित

Patil_p

टीम इंडियामधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

Rohan_P

अंधांच्या तिरंगी मालिकेत पाक विजेता

Patil_p

रोनाल्डो आणखी एका पुरस्काराचा मानकरी

Patil_p

युफा पात्रता स्पर्धेतही व्हीएआरचा वापर

Patil_p
error: Content is protected !!