तरुण भारत

भारतीय संघ 8 महिन्यांत मायदेशात 21 सामने खेळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने तर केवळ 4 कसोटी सामने खेळणार आहे. बीसीसीआयने सोमवारी वेळापत्रक जाहीर केले असून या कालावधीत फक्त 3 वनडे सामने ठेवण्यात आले आहेत.

Advertisements

या आठ महिन्यांच्या कालावधीत न्यूझीलंड (नोव्हेंबर-डिसेंबर), वेस्ट इंडीज (फेब्रुवारी 2022), लंका (फेब्रुवारी-मार्च 22), दक्षिण आफ्रिका (जून 22) हे संघ भारताच्या दौऱयावर येणार आहेत. डिसेंबर-जानेवारी या मधल्या काळात भारतीय संघ द.आफ्रिकेचा दौरा करेल आणि एप्रिल-मे या कालावधीत आयपीएल खेळविले जाईल. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ 2 कसोटी, 3 टी-20 सामने तर विंडीजविरुद्ध 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळेल. लंका संघ 2 कसोटी 3 टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर जूनमध्ये दहा दिवसांच्या छोटय़ा दौऱयात द.आफ्रिका संघ 5 टी-20 सामने खेळणार आहे. ‘पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात वर्षभरातच होणार असल्याने आम्ही टी-20 सामन्यांची संख्या जास्त ठेवली आहे. या स्पर्धेपूर्वी पुरेसे सामने खेळावयास मिळावेत हा त्यामागचा हेतू आहे,’ असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

चार कसोटीपैकी कानपूर, मुंबई येथे (न्यूझीलंड) दोन व बेंगळूर, मोहाली येथे (लंका) सामने खेळविले जातील. रोटेशन धोरणामुळे विविध केंद्रांना मर्यादित षटकांचे सामने आयोजित करावयास मिळणार आहेत. त्यात जयपूर, रांची, लखनौ, विशाखापट्टणम, कोलकाता, अहमदाबाद, कटक, त्रिवेंद्रम, चेन्नई, राजकोट, दिल्ली यांचा समावेश आहे.

मायदेशात होणाऱया सामन्यांचे वेळापत्रक

न्यूझीलंडविरुद्ध

17 नोव्हें.         पहिली टी-20      जयपूर

19 नोव्हें.         दुसरी टी-20       रांची

21 नोव्हें.         तिसरी टी-20      कोलकाता

25-29            नोव्हें.    पहिली कसोटी     कानपूर

3-7 डिसें.        दुसरी कसोटी      मुंबई

विंडीजविरुद्ध

6 फेब्रु.22         पहिली वनडे       अहमदाबाद

9 फेब्रु.22         दुसरी वनडे        जयपूर

12 फेब्रु.22       तिसरी वनडे       कोलकाता

15 फेब्रु.22       पहिली टी-20     कटक

18 फेब्रु.22       दुसरी टी-20      विझाग

21 फेब्रु.22       तिसरी टी-20     त्रिवेंद्रम

श्रीलंकेविरुद्ध

फेब्रु.25-मार्च 1 पहिली कसोटी     बेंगळूर

5-9 मार्च 22    दुसरी कसोटी      मोहाली

13 मार्च 22     पहिली टी-20      मोहाली

15 मार्च 22     दुसरी टी-20       धरमशाला

18 मार्च 22     तिसरी टी-20      लखनौ

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

9 जून 22         पहिली टी-20      चेन्नई

12 जून 22       दुसरी टी-20       बेंगळूर

14 जून 22       तिसरी टी-20      नागपूर

17 जून 22       चौथी टी-20       राजकोट

19 जून 22       पाचवी टी-20     दिल्ली.

Related Stories

भारतात कसोटी मालिका जिंकणे आवडेल

Patil_p

विराट, रोहित, बुमराह अव्वल श्रेणीत कायम

Patil_p

रियल माद्रीदचे दोन फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p

सरिता मोर, अंशू मलिक उपांत्य फेरीत

Patil_p

एटीपी टूरवरील सिनेर सर्वात तरूण विजेता

Patil_p

विद्यमान विजेत्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात

Patil_p
error: Content is protected !!