तरुण भारत

साताऱयात उद्या मोफत महालसीकरण

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सातारा शहरात उद्यापासून मोफत व रजिस्ट्रेशनशिवाय महालसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 ठिकाणी लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आली असून या महालसीकरणात साताऱयातील 1 लाख 64 हजार 275 एवढय़ा नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्टय़ असून दर दिवशी प्रत्येक केंद्रावर 600 वर नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

Advertisements

सातारा शहरातील लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे महालसीकरणाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नगरपालिका ग्रंथालय, सदरबझार, नगरपालिका ऑफिस सदरबझार, नागरी आरोग्य सुविधा केंद्र गोडोली, रविवार पेठ समाजमंदिर, कूपर कॉलनी सांस्कृतिक हॉल, पुष्करणी क्लिनिक, महाजन वाडा मंगळवार पेठ, नगरपालिका मंगल कार्यालय केसरकर पेठ, मेडिटेशन हॉल चिमणुपरा, भवानी हायस्कूल सातारा मल्हारपेठ, श्रीपतराव हायस्कूल करंजे, शनिवार पेठ समाज मंदिर व कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्र अशा 15 ठिकाणी दररोज 600 च्या नागरिकांना कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस असे लसीकरण लसींच्या उपलब्धेनुसार करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

या 15 लसीकरण केंद्रांवर आरोग्य विभागाची यंत्रणा तैनात करण्यात आली असून एएनएम व ऑपरेटरसह नर्सेस येथे कार्यरत राहणार आहेत. ज्या प्रमाणे शासनाकडून लशीचे डोस उपलब्ध होतील असे या सर्व केंद्रांवर नागरिकांना कोणतेही रजिस्ट्रेशन न करता मोफत लस देण्यात येणार आहे. त्या त्या केंद्रांवर आधारकार्डसह जावून नागरिकांनी रांगेत उभे राहून व कोरोना नियमांचे पालन करुन लस घ्यावी, असे आवाहन बापट यांनी केले आहे.

1 लाख 64 हजार 275 उद्दिष्ट

या महालसीकरण मोहिमेत या 15 केंद्रांवर 1 लाख 64 हजार 275 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून त्या त्या केंद्राच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे डोस ज्या प्रमाणात उपलब्ध असतील त्या प्रमाणात ते देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रांवर दररोज 600 च्या वर लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असून शहरातील लसीकरण 100 टक्के करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.

Related Stories

सातारा : अंभेरीत कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला 9 वर

triratna

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटच्या माध्यमातून केली ‘ही’ मागणी

triratna

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

triratna

कृषी सुधारणा विधेयक पुस्तिकेचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

triratna

सातारा : सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई सर्रास एकरी ४० हजार द्यावी : डॉ.भारत पाटणकर

triratna

शेतकर्‍यांना मिळणार बांधावर खते

triratna
error: Content is protected !!