तरुण भारत

त्रिशंकू भागातील सर्वप्रकारच्या समस्या सातत्याने सोडवल्या

विसावा पार्कमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

आमदार फंडासह शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून त्रिशंकू भागात सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्रिशंकू भागात प्रत्येक कॉलनी, नगर, वसाहत येथील अंतर्गत रस्ते मार्गी लावले. पूर्वीपासूनच या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून या भागातील सर्व प्रकारच्या समस्या सातत्याने सोडवल्या आणि यापुढेही सोडवू, असे आश्वासक प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून विसावा नाका येथील विसावा पार्कमधील अंतर्गत रस्त्यासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम या योजनेतून 12 लाख 75 हजार रुपये निधी मंजूर झाला. या रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी ढाणे, विलास पवार, डॉ दीपक निकम, ऍड. संजय भोसले, डॉ अमोल ढवळे, दत्ताजी भोसले, ओंकार तिखे, हरेश दोशी, यतीन दोशी, ईशान दोशी, राजन पोरे, संजय निकम सर, सावंत सर, प्रसाद कुलकर्णी, एस एन कुलकर्णी, रमेश जाधव, चंद्रकांत भोसले, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, रवि पवार, राजेंद्र राजे, ओमकार भंडारे आदी उपस्थित होते. 

सातारा पालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट नसल्याने त्रिशंकू भागातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी नेहमीच अडचणी यायच्या. मात्र सर्वप्रकारच्या अडचणींवर मात करून त्रिशंकू भागासाठी निधी उपलन्ध करून दिला आणि विविध प्रकारची विकासकामे सातत्याने मार्गी लावली. हद्दवाढ झाली तरच त्रिशंकू भागाचा विकास होणार आहे. या दूरदृष्टीतून सातारा पालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. आता त्रिशंकू भाग पालिका हद्दीत आल्याने या भागातील मूलभूत सुविधांसह सर्व प्रकारच्या समस्या सोडवू आणि ख्रया अर्थाने या भागाचा कायापालट करुं, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिला.  

Related Stories

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात 6 नवे रुग्ण

triratna

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 66 रूग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

Rohan_P

सोलापूर शहरात 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दोघांचा मृत्यू

triratna

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी : पोलीस उपनिरीक्षकासह सासू, ननंद, मित्रावर गुन्हा दाखल

triratna

शाहूपुरीचा पाणी पुरवठा आजपासून सुरळीत होणार

Patil_p

सातारा : वाईच्या तरुणांची धोम बलकवडी धरणाला सायकलवरून प्रदक्षिणा

triratna
error: Content is protected !!