तरुण भारत

औंध येथील युवकाचा अपघाती म्रुत्यु

 वार्ताहर /औंध

नांदोशी ता. खटाव नजिकच्या लकडय़ाच्या पुलाजवळ शनिवारी औंध येथील 25 वर्षीय युवकाच्या अपघाती मूत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी  संबंधित रस्त्याचे ठेकेदार व मँनेजरवर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संबंधित ठेकेदाराशर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी औंध ग्रामस्थ व युवकांमधून केली जात आहे.

Advertisements

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी. येथील प्रशांत सुरेश  हुंबे  भोसले वय 25 हा युवक शनिवारी रात्री  उशीरा

त्याच्या दुचाकी गाडीवरून घाटमाथ्याकडून  औंधकडे येत होता. सध्या घाटमाथा -औंध राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.  नांदोशी गावा जवळील लकडय़ाच्या पुलावर संबंधित युवक आला असता त्याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या  खडडय़ाचा अंदाज न आल्याने  संबंधित युवक आपल्या दुचाकी गाडीसह खड्डय़ात कोसळला. 

रात्री सुमारे 11.30ते 12च्या दरम्यान ही घटना घडली आहे अशी परिसरात चर्चा सुरू होती. मात्र रात्री रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ कमी असल्याने व तो युवक खडडय़ात पडल्याने हा अपघात झाल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही सकाळी याबाबतची माहिती मिळाली असता प्रशांतचा जाग्यावरच मूत्यु झाल्याचे समजले.

  रस्त्याचे काम सध्या सुरू असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे व चरी खणून ठेवल्या आहेत.संबंधित ठेकेदाराने  कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक, बँरिकेटस व रिफ्लेक्टर व अन्य सुरक्षित साधने लावलेली नाहीत. दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना कसलीही कल्पना येत नाही त्यामुळे संबंधित युवकाचा मूत्यु झाला .युवकाच्या मूत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी रस्त्याचे ठेकेदार दत्तात्रय हणमंत देसाई व मँनेजर रामचंद्र लक्ष्मण माळी यांचे विरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची फिर्याद  सहाय्यक पोलीस फौजदार बी.एन.जाधव यांनी दिली आहे.

Related Stories

शिवरायांचा तेजस्वी इतिहास जपणारं गड-किल्ल्यांचं गाव अंबवडे बुद्रुक

triratna

सातारा : धामणेर येथे बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्यावर केली कारवाई

triratna

साताऱयात जमावाकडून होमगार्डला मारहाण

Patil_p

अंतिम वर्षाची परिक्षा असणार बहुपर्यायी स्वरुपाची

triratna

‘भारत बंद’मध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना सहभागी नाही

triratna

सातारकरांना टोलमाफी मिळालीच पाहिजे

Patil_p
error: Content is protected !!