तरुण भारत

पुण्यातील खाजगी सावकार महिलेच्या तावडीतून सुटका करा

प्रतिनिधी/ सातारा

शाहुपूरी येथील सेंट्रीग व्यावसायिक राजेंद्र होटकर यांनी सेंट्रीग व्यवसायाकरता पुणे येथील खाजगी सावकार सिमा भिकू राठोड हिच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. होटकर यांनी दोन लाख रुपये परत केले तरीही वारंवार सातत्याने धमकी देवून आणखी पैशांचा तगादा लावल्याने होटकर कुटुंबिय वैतागले असून खाजगी सावकारीतून सुटका करावी, सावकारी करणाऱया महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अजयकुमार बन्सल यांच्याकडे होटकर यांच्यासह रिपाइंचे शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisements

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पुणे येथील सीमा भिकू राठोड यांच्याकडून शाहुपूरीतील राजेंद्र होटकर यांनी खाजगी सावकार पद्धतीने सेंट्रींग व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात कॅनरा बँकेचे दोन धनादेश दिले होते. त्याबदल्यात आजतागायत चेकने एक लाख रुपयांची एन एफ टी केली आहे. तसेच सिमा राठोड यांची मैत्रीण प्रतीक्षा पांडुरंग देवकर यांच्या नावे चेक 90 हजार रुपयाची एन एफटी केली आहे. सीमा राठोड यांना दोन लाख रुपये दिले आहेत. त्यानंतरही आणखी बेकायदेशीररीत्या दमदाटी करून 2 धनादेश घेतले. त्याच्या बदल्यात दि. 21 जानेवारी ते जुलै पर्यंत पुन्हा पंधरा हजार रुपये घेतले. तसेच 11 ते 12 महिने सोळा हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे व्याज वसुल केले आहे. त्याच्या अकरा महिन्याच्या संपूर्ण पावत्या बँकेमध्ये भरलेल्या चलन हेटकर यांच्याकडे आहेत. ते सुद्धा 1 76 000 रुपये इतकी रक्कम होत आहे. कोरोना कालावधीमध्ये कारणामुळे पैसे दिलेली नाहीत तरी अशा प्रकारे रक्कमा देऊन सुद्धा संबंधितांनी आहेत. या दोन धनादेशामधील एकाच बँकेत टाकून सात लाख रुपयाला बाऊन्स केला आहे. तरी संबंधित महिला ही सारखेच पैशाचा तगादा लावून होटकर कुटुंबियांना बेकायदेशीर रित्या धमकावून आणखी पैशाची मागणी करत आहे. अन्यायकारक अशी धाक दडपशाहीने होटकर कुटुंबीय त्याच्यावरती दबाव आणण्यास सुरुवात केली आहे सातत्याने या ना त्या नंबर वरून धमकीचे फोन येत आहेत तरी संबंधित व्यक्तींपासून होटकर कुटुंबीय वैतागले आहेत त्यांची सुटका करावी व योग्य तो न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे. 

Related Stories

सातारा : सरपंच परिषद राज्याच्या विकासासाठी योगदान देईल – शरद पवार

Abhijeet Shinde

इचलकरंजीतील कुडचे मळ्यातील उर्वरित अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

अफवा पसरवल्याबद्दल 230 गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

कोरेगावात आयपीएस अधिकारी रितू खोखर यांनी वाहतुकीला लावली शिस्त

Patil_p

लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्याचे वीजबिल एकत्रित

Abhijeet Shinde

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया आजपासून

Rohan_P
error: Content is protected !!