तरुण भारत

दरेकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस काळे फासून मारले जोडे

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर भाजपाचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर रंगलेला गालाचा मुका घेणारा पक्ष अशी टीप्पणी केल्याचे पडसाद साताऱयात उशीरा उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्यावतीने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर प्रवीण दरेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस अगोदर शाही ओतून नंतर चप्पलने मारत निषेध नोंदवला. दरम्यान, दरेकर यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते पद दिले आहे की महिलांचा अपमान करण्यासाठी. आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी यावेळी दिला.

Advertisements

शिरुर येथे गेल्या चार दिवसांपूर्वी भाजपाचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती सेलच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्यासमोरच सोमवारी आंदोलन आयोजित केले. या आंदोलनाचे नेतृत्व  युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांच्याकडे होते. तर यावेळी जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांच्यासह युवती सेलच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यवेळॅ बोलताना स्मिता देशमूख म्हणाल्या, राष्ट्रवादी युवती सेलच्यावतीने प्रवीण दरेकरांचा आज आम्ही जाहीर निषेध करतो आहे. ते एक विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवले पाहिजे. त्यांना जरा जाणीव असली पाहिजे. आपल्याला विरोधी पक्ष नेते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केले आहे. महिलांचा अपमान करण्यासाठी विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही. त्यांच्या गळय़ात आहे भाजपाची माळ आणि पायात चाळ आहे. ते कुठे जातात काय करतात हे जनतेला माहिती आहे त्यामुळे महिलांविषयी बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती सेल जाहीर निषेध करत आहोत. आम्ही साताऱयात प्रवीण दरेकरांना फिरकु देणार नाही.तुमची हिमंत असेल तर साताऱयात पाऊल ठेवून दाखवा. राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुम्हाला चप्पलने मारायला कमी करणार नाही. भाजपा नेत्यांचे आम्ही पाहतोय उठसुठ महिलांचा अपमान करता. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत तुमच्याही घरात महिला आहेत. तुम्ही महिलांमुळेच येथे आहात. महिलांचा मान द्यायला शिका, महिलांचा सन्मान करायला शिका. आज प्रत्येक गोष्टीत महिला खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. राजकारणात कुठल्या महिलेने आल पहिजे आणि कुठल्या महिलेने नाही आले पाहिजे हा प्रश्न त्या महिलेचा आहे. ज्या पक्षात गेल्या आहेत त्यांचा आहे. तुम्ही सांगू नका. जे वक्तव्य केले ते निच आणि घाणेरड वक्तव्य आहे. आम्हाला अजिबात पटलेल नाही. अशी जर भाजपाच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य केली ना तर त्यांना चप्पलीनेच हाणू आम्ही त्यांना. आम्ही साक्षात तोंड काळ करु. महिला वर्गाची जाहीर माफी मागितली पाहिजे, असा इशारा प्रवीण दरेकरांना त्यांनी दिला.

चित्रा वाघ यांचाही घेतला खरपूस समाचार

चित्रा वाघांना मला विचारायचे आहे की उठसुठ त्या महिलांना कोण काय बोलल की पुळका काढत फिरत असतात. आज तुमच्या पक्षातील नेते असले घाणेरडे वक्तव्य महिलांविषयी करतात तुम्हीही महिला आहात.तुम्ही त्यांना जावून विचारा की तुम्ही असे का बोलला.माझ चॅलेज आहे चित्रा वाघ यांना अशा शब्दात स्मिता देशमुख यांनी चित्रा वाघ यांचाही समाचार घेतला.

Related Stories

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा

triratna

नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात कास्ट्राईबतर्फे धरणे आंदोलन

triratna

विनापरवाना मांस वाहतूक करणारे दोघे ताब्यात

Omkar B

सातारा जिल्ह्यात 98 नागरिकांना दिला डिस्चार्ज

triratna

महाराष्ट्र : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

Rohan_P

सातारा पालिकेवर सेनेचाच भगवा फडकणार

Patil_p
error: Content is protected !!