तरुण भारत

जिह्यात कोरोनाचे 35 नवे रूग्ण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आह़े सोमवारी कोरोनाचे 35 नवे रूग्ण मिळून आले आहेत़ तर 145 बरे झालेल्या रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े उपचारातील रूग्णांची संख्या देखील कमी झाली आह़े उपचारात आता केवळ 650 रूग्ण असून त्यामधील 319 जणांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत़

Advertisements

 जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कोरोनाच्या केवळ 3 हजार 329 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 794 चाचण्यांपैकी 19 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 535 पैकी 16 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये दापोली 6, खेड 3, गुहागर 2, चिपळूण 3, संगमेश्वर 7 रत्नागिरी 13, लांजा 1 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ मंडणगड, राजापूर जिल्हयात सोमवारी कोरोना रुग्ण सापडलेला नाही. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 हजार 419 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.04 इतका आह़े

    तर सोमवारी 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये मंगडणग 2, खेड 1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 145 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 224 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.97 इतके आह़े तर 650 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 319 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़

Related Stories

रत्नागिरी : प्रेक्षकाविना चित्रपटगृहे ओस

Abhijeet Shinde

तळाशीलवासीयांच्या आंदोलनास गाबित समाजाचा पाठिंबा

NIKHIL_N

दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने प्रशासनाची धावपळ

Abhijeet Shinde

टाळेबंदी काळात जिल्हय़ात खासगी सावकारीला जोर

Omkar B

कराड नगरपालिकेतर्फे विविध स्पर्धा

Patil_p

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सुधारित,अंतिम अंदाजपत्रक मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!