तरुण भारत

रत्नागिरीच्या लेखिकेचे पुस्तक स्वायत्त महाविद्यालयात

पर्णिका भडसावळे/ खंडाळा

रत्नागिरीतील ललित लेखिका रश्मी कशेळकर यांच्या ‘भुईरिंगण’ या  पुस्तकाची देवरुख येथील स्वायत्त आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रतिथयश लेखकांबरोबरच गोव्यातील लेखक विठ्ठल गावस आणि कोकणातील कशेळकर या एकमेव लेखिकेला हा मान प्राप्त झाल्याचे  आठल्ये-सप्रे महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम समितीच्या प्रमुख डॉ. वर्षा फाटक यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना सांगितले.

Advertisements

  डॉ. फाटक यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासक्रम समितीमध्ये मराठी विषय तज्ञ नितीन आरेकर, मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम समितीचे डॉ. अनिल सकपाळ, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.रणधीर शिंदे, पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे डॉ. थुकाराम रोंगटे, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय मराठीच्या प्राध्यापिका डॉ. राजश्री देशपांडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय मराठी विभागाच्या डॉ. निधी पटवर्धन यांचा समावेश आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम समितीने शिफारस केल्यानुसार ‘भुईरिंगण’ ची तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी निवड केल्याचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले.

 महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त

‘भुईरिंगण’ या साहित्यकृतीची पहिली आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केली आहे. या पुस्तकाला राज्यस्तरीय बारा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार लाभलेला आहे. पहिली आवृत्ती सहा सात महिन्यात संपली. आता या पुस्तकाची दुसरी आवृत्ती रत्नागिरीतील सुरंगी प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांचे दुसरे पुस्तक ‘भुयपर्मळ’ मार्च 2021 ला प्रकाशित झालेय आणि त्यावर मौज प्रकाशनगृहाची मुद्रा उमटलेली आहे.

  मूळच्या देवगड येथील रश्मी कशेळकर सध्या रत्नागिरी शहरात स्थायिक झाल्या आहेत. शाळा, कॉलेजच्या वयात त्या लिहित नव्हत्या पण वाचनाचा नाद मात्र होता. घरात वाचनाचे वातावरण नव्हते. त्यांची आई मिळेल ते वाचायची, गोष्टी सांगायची. त्यांच्या लेखनाला खूप उशीरा सुरूवात झाली.2009 साली त्यांचा पहिला लेख प्रकाशित झाला. कशेळकर यांनी पहिला ललितलेख लिहिला आणि आजही त्या हाच साहित्यप्रकार हाताळत आहेत. लेखकाला प्रसिद्धीसाठी खडतर प्रवास करावा लागतो, असा अनेकांचा अनुभव आहे. पण त्यांच्या बाबतीत मात्र ते काहीच घडलेले नाही असेही त्या म्हणाल्या.

कशेळकर पुढे म्हणाल्या की, लेखिका म्हणून आपल्याला नेहमी चांगले मानधन मिळालेय आणि रॉयल्टीसुद्धा मिळाली. लेखिका म्हणून माझ्यासाठी जसे संपादक महत्त्वाचे आहेत, तसंच संसारी स्त्राr म्हणून घरच्यांचं पाठबळही महत्वाचं आहे. माझं घर सुसंस्कृत असल्यामुळे वाचन लेखनाला प्रोत्साहन मिळालं.

आता कथा, कादंबरी खुणावतेय…

कशेळकर यांचे आजपर्यंत 70 ललितलेख प्रकाशित झालेले आहेत आणि हा साहित्यप्रकार त्यांच्या शैलीमुळे, त्यातल्या आशयामुळे वाचकप्रिय झालेला आहे. आगामी काळात त्यांना कथा लिहायची आहे. तसेच कादंबरी हा साहित्यप्रकारही हाताळायचा आहे. जी .ए. त्यांचे आवडते कथालेखक आणि आत्ताचे जयंत पवार, किरण गुरव, मोनिका गजेंद्रगडकर. अनुराधा पाटील, माया पंडित, अनुजा जोशी, सुनिता डागा, किरण येले, दिनकर मनवर यांच्या कविता त्या आवर्जून वाचतात.   

 सितार वादक उस्ताद सुजाद खान किंवा उस्ताद शफाकत अली खान किंवा मग देव आनंदच्या काळातली जुनी गाणी चालू असताना अनेक लेख तयार झालेले आहेत. आपल्याला भटकंतीची आवड आहे आणि मुख्य म्हणजे एकटं भटकायला आवडतं. खेडय़ात जाऊन राहायला आवडतं. समुद्रकिनाऱयालगतची गावं खूप आवडत असल्याचे कशेळकर यांनी सांगितले.

 तेव्हाच अत्यानंद होईल…

 तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात आपले ‘भुईरिंगण’ समाविष्ट केल्याबद्दल आठल्ये सप्रे पित्रे या स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्थेला, निवड समितीला आपण धन्यवाद देते. कोकणातल्या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात पुस्तकाचा समावेश झाल्याने कोकणातील विविधता या विद्यार्थ्यांना समजेल. देवरूखसारख्या सह्याद्रीच्या जवळ राहणाऱया विद्यार्थ्याला समुद्रकाठचं लोकजीवन कळेल. त्याला  आपला प्रदेश फिरावासा वाटेल, तो अनुभव घेईल आणि तो लिहायलाही लागेल आणि आता मी सुद्धा लिहितो, असं जेव्हा कोणी सांगणारा भेटेल तेव्हा मला खऱया अर्थाने अत्यानंद झालेला असेल.

           रश्मी कशेळकर, रत्नागिरी

Related Stories

तान्हुल्याच्या भेटीसाठी व्याकुळली आई

NIKHIL_N

दहिहंडी न फोडता त्यांनी केला विद्यार्थ्यांचा सत्कार

Patil_p

सिंधुदुर्गात अवैध पद्धतीची स्पिअर फिशिंग मासेमारी

NIKHIL_N

गुलाब वादळाचा रापणीस फटका

triratna

कळसुलकर हायस्कूलच्या आनंद शिशुवाटीकेचे उद्घाटन

Ganeshprasad Gogate

निवळीत पिक नुकसान पंचनाम्यांसाठी अधिकारी शेताच्या बांधावर

Patil_p
error: Content is protected !!