तरुण भारत

राष्ट्रीय सब-ज्युनियर, ज्युनियर टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचे संघ जाहीर

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

गोवा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेने 25व्या सब-ज्युनियर आणि 28व्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारे आपले मुलांचे आणि मुलींचे संघ जाहीर केले आहेत. सदर स्पर्धा आग्रा येथे 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होईल.

Advertisements

ही स्पर्धा ऐरव्ही जम्मू काश्मीरमध्ये होणार होती. मात्र सक्त एसओपीसाठी भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघाने ती आग्रा येथे नेली. 19 सप्टेंबर रोजी गोव्याच्या चारही संघांना निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, सागचे खजिनदार अश्रफ पंडियाल, गोवा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे सचिव रुपेश नाईक तसेच नीलेश नाईक, हरेश पार्सेकर, हेमंत खोत आणि अजिंक्य नाईक उपस्थित होते.

गोवा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेने आपल्या सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट फातोर्डा स्टेडियमवर केली आहे. सब-ज्युनियर संघ सोमवारी रवाना झाला तर ज्युनियर संघ 24 सप्टेंबरला आग्रा रवाना होईल.

 16 वर्षांखालील मुलांचा संघः वैष्णव नाईक, साईश नाईक, अक्षद नाईक, स्वंयम फडते, कन्हैया गावडे, हर्ष गाला, साहिल पारोडकर, प्रथमेश देसाई, शौनक नाईक, आर्यन पालकर, आर्यन पालकर, दीप शेटय़े, ओम गावडे, शुभांकर देसाई व युवराज बोरकर.

16 वर्षांखालील मुलींचा संघः कृतिका महाले, नेत्रा लमाणी, सिंथिया नाईक, मायेशा पालयेकर, कोमल हल्लुरा, तन्वी गावडे, रिया मालवणकर, पायल हलगली, आर्या आजगावकर, प्राची नाईक, संतोषी तुयेकर, सानिका धुरी, संतोषी सिनारी व इशा नाईक.

19 वर्षांखालील मुलांचा संघः संकल्प नाईक, पुनीत खांडेपारकर, खुतबुद्दिन जमादार, विजय हलगेकर, राहिल तळेगावकर, नमेश काणकोणकर, गौरांग पिकुळकर, पूर्णय सुधीर, अभिषेक गावकर, प्रतीक नाईक, तन्मय पागी, वल्लभ नाईक, साईश गावडे व स्मरण गावडे. 19 वर्षांखालील मुलींचा संघः मोनिका नाईक, अंकिता जल्मी, इशा नाईक, अंकिता गुप्ता, रिया फोलकर, सोनल सिंग, पुजा विश्वकर्मा, कनक्षा गावडे, साक्षी नाईक, मिनाक्षी हलगिरी, के. दिक्षा, अमिषा शेटगावकर, पुजा गुप्ता व संतोषी तुयेकर.

Related Stories

भाजप प्रदेश अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज प्रक्रिया

Patil_p

प्रत्येक निवडणूक फायनलच अन् प्रत्येक मतदार महत्त्वाचा

Patil_p

हेडगेवारची सलग 14 व्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा

Omkar B

साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 मध्ये थेट लढत

Patil_p

पणजीसह सहा पालिकांसाठी 423 उमेदवार

Patil_p

‘बागीतलं घर’ एक भावनिक प्रवास

Amit Kulkarni
error: Content is protected !!