तरुण भारत

विश्व मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी तानाजी, डॉ. कुडचडकर, डॉ. रिबेलो पात्र

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

स्पर्धेतील आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवताना गोव्याच्या तानाजी सावंतने अखिल भारतीय मास्टर्स रेंकींग बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. या कामगिरीच्या जोरावर तानाजी सावंत स्पेनमध्ये नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात होणाऱया बीडब्लूएफ विश्व सीनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

Advertisements

स्पेनमध्ये होणाऱया स्पर्धेत भारतीय मास्टर्स बॅडमिंटन संघ निवडण्यासाठी अखिल भारतीय मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. तानाजी सावंतच्या व्यतिरिक्त डॉ. सतीश कुडचडकर आणि डॉ. सिक्लेटिका रिबेलो यांच्या चांगल्या कामगिरीमुळे  हे दोघेजण स्पेनच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

75 वर्षांवरील पुरूषांच्या एकेरीत डॉ. सतीश कुडचडकरने मोहन मुरारी लाल श्रीवास्तव यांचा उपान्त्य सामन्यात 21-19, 21-15 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 65 वर्षांवरील पुरूष एकेरीतील उपान्त्यपूर्व लढतीत गोव्याच्या तानाजी सावंतने लक्ष्मणभाय चावडा याला 21-13, 21-18 असे पराभूत केले आणि आरामात उपान्त्य फेरी गाठली.

महिलांच्या 75 वर्षांवरील एकेरीतील उपान्त्य सामन्यात गोव्याच्या डॉ. सिक्लेटिका रिबेलोला ऑल्गा डिकॉस्ता हिच्याकडून 21-6, 21-9 असे पराभूत व्हावे लागले. 65 वर्षांवरील मिश्र दुहेरीतील उपान्त्यपूर्व सामन्यात काशिनाथ जल्मी आणि पर्पेच्युआ जॅक्स जोडीला व्यंकटाचलैया व्ही आणि भाग्यलक्ष्मी यांच्याकडून 21-10, 21-16 असा पराभव स्वीकारावा लागला तर पुरूषांच्या 65 वर्षांवरील उपान्त्यपूर्व लढतीत गोव्याच्या प्रदीप धोंड व तानाजी सावंत जोडीला पुट्टाराज एम. एस. आणि जयंत शेट्टी या जोडीने 21-18, 21-18 असे पराभूत केले.

Related Stories

जनसुनावणी केवळ दिखावा

Amit Kulkarni

म्हापशात भेडसावणाऱया समस्यांकडे लक्ष देण्यासाठी व्यापाऱयांची पालिकेकडे धाव

Omkar B

वास्कोत दुपारपर्यंत खरेदीसाठी लोकांची वर्दळ, नंतर कडकडीत बंद

Amit Kulkarni

साळगाव मतदारसंघतील निवृत्त शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

महाराष्ट्रातून येणाऱयांना कोरोना चाचणी सक्ती करावी

Amit Kulkarni

मार्केट संकुल बंदीवर दुसऱया दिवशी कारवाई सुरूच

Omkar B
error: Content is protected !!