तरुण भारत

होंडा येथे ट्रकाची वीजखांबाला धडक

वीजवाहीन्याची नुकसानी.सतर्कतेमुळे अनर्थ टळला.जुने वीजखांब बदलण्याची मागणी.

प्रतिनिधी /वाळपई

Advertisements

  होंडा भागांमध्ये वीजवाहिन्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. यामुळे वीज खांबांची उंची वाढवावी व जुने झालेले वीज खांब ताबडतोब बदलावेत अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे वारंवारपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सोमवारी सकाळी एका ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिल्यामुळे वीज खांब विजेच्या वाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणात हानी झाली. यामुळे सदर भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

याबाबतची माहिती अशी की गोवा कर्नाटक दरम्यानच्या चोरला भागातून अवजड प्रकारची वाहतूक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आहे. हा आदेश जवळपास एक वर्षापूर्वी करण्यात आला होता. मात्र त्याची अजिबात अंमलबजावणी होत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण अवजड प्रकारची वाहतूक सदर महामार्गावर होताना दिसत आहे. आज सकाळी 14 चाकी ट्रक होंडा भागाच्या मध्यवर्ती परिसरात आला असता त्यांनी विजेच्या खांबाला धडक दिली. यामुळे वीज वाहिन्यांच्या तारा लोंबकळून पडल्या .सुदैवाने उपस्थित असलेल्या नागरिकांनी सतर्कता दाखविल्याने जीवितहानी झाली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

वीजवाहीन्या व खांब बदलण्याची मागणी.

दरम्यान यासंदर्भात भागातील नागरिकांनी वीज वाहिनीचे खांब व जुनी झालेली वीज यंत्रणा बदलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भाची मागणी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने करण्यात येत आह. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याचा तमाम नागरिकांचा आरोप आहे .होंडा भाग हा दिवसेंदिवस झपाटय़ाने विकसित होताना दिसत आहे. भागाच्या मध्यवर्ती परिसरामध्ये मोठमोठय़ा इमारती उभ्या राहिलेल्या आहेत .यामुळे अनेक वर्षांपूर्वी घालण्यात आलेले वीज खांब कमी उंचीचे ठरत आहे . यामुळे विविध वाहिन्यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होताना दिसत आहे. यामुळे जुनी झालेली वीज वाहिनी व खांब बदलण्याची मागणी करण्यात येत आहे .मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

ही वाहने येतातच कशी ? दरम्यान गोवा कर्नाटक दरम्यानच्या चोरला भागातून अवजड प्रकारच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र या बंदी आदेशाची  अंमलबजावणी होत नसल्याचे आता स्पष्ट झालेली आहे. कारण मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरला भागातून जात असल्यामुळे सदर भागातील प्रवासीवर्गा?ला मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. विजेच्या खांबाला धडक दिलेला ट्रक अवजड स्वरूपाचा असून तो चोरलामार्गे बेळगाव याठिकाणी जाणारा होता अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.

Related Stories

कोडली गणेशोत्सव अध्यक्षपदी दिलीप गावकर

Amit Kulkarni

कवळे ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनावर चर्चा

Patil_p

गीत गायनाच्या माध्यमातून पोलिसांकडून कोरोना जागृती

Omkar B

महिला काँग्रेसकडून मडगावात वाढीव वीजबिलांचा निषेध

Patil_p

आपच्या रोजगार यात्रेस कुंभारजुवा, मयेत प्रचंड प्रतिसाद

Amit Kulkarni

सरकारकडून कंत्राटदारांची 500 कोटीची बिले थकली

Patil_p
error: Content is protected !!