तरुण भारत

जुने गोवे येथील हेलिपॅडचे लोकार्पण

प्रतिनिधी /पणजी

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेशी दर्शन योजनेअंतर्गत जुने गोवे येथे उभारण्यात आलेल्या हेलीपॅडचे केंद्रीय पर्यटन मंत्री श्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. गोव्यातील पर्यटन वाढविण्याच्या  हेतूने गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन महामंडळातर्फे हे हेलीपॅड बांधण्यात आले आहे.

Advertisements

या उद्धाटन सोहळय़ाला श्री. रेड्डी यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उप मुख्यमंत्री श्री. मनोहर आझगांवकर, गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे, कुंभारजुवा मतदार संघाचे आमदार श्री. पांडुरंग मडकईकर, जुने गोवेच्या सरपंच श्रीमती जनिता मडकईकर तसेच गोवा पर्यटन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

राजधानी पणजीपासून सुमारे दहा की.मी. अंतरावर मांडवीच्या तिरावर बांधण्यात आलेल्या या हेलिपॅडमुळे उच्च प्रतिचे पर्यटक गोव्याकडे आकृष्ट होतील अशी आशा असून येत्या डिसेंबरपासून पूर्ण जोमाने हे हेलिपॅड पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल.

गोवा ही देशाची शान असून गोव्याचा पर्यटनदृष्टय़ा विकास साधण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव साजरा करीत असून गोव्याचा पर्यटनाच्या बाबतीत अधिक विकास व्हावा, यासाठी वेगवेगळय़ा योजनाअंतर्गत निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही श्री. जी. किशन रेड्डी यांनी यावेळी दिली.

 याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पर्यटन महामंडळाचे अधिकारी श्री. दीपक नार्वेकर यांनी केले.

Related Stories

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 454 वर

tarunbharat

पेडेतील स्विमिंग पूल राज्यस्तरीय खेळाडूंसाठी खुला

Omkar B

माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर

Omkar B

थिवी अपघातात एक ठार

Omkar B

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा राज्य कार्यकारिणी जाहीर

Amit Kulkarni

कोरोनाची स्थिती स्फोटक

Patil_p
error: Content is protected !!