तरुण भारत

पर्रीकर यांची राजकारण आणि पक्षावर मजबूत पकड होती देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /पणजी

आधुनिक गोव्याचे शिल्पकार तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर आज आपल्यात नाहीत. त्यांची गोव्यातील राजकारण आणि पक्षावर मजबूत पकड होती. त्यांच्या निधनानंतर आपण पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहोत. या पार्श्वभूमीवर आपल्यासमोर आव्हान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Advertisements

येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सह प्रभारी किशन रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री दर्शना र्देप्. गोव्याचे प्रभारी सी टी रवी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानाबडे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, गोव्यात भाजपच्या जडणघडणीमध्ये स्व. पर्रीकर यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा वाटा ही मोलाचं आहे. या लोकांनी केवळ पक्ष वाढवला नाही तर त्याची पाळेमुळे मजबूत केली. आता या वृक्षाच्या फांद्या मजबूत करण्याची जबादारी आपली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांकडून वरि÷ नेत्यांपर्यंत सर्वांनी आळस झटकून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात देशाचा केवळ विकासच केला नाही तर जगभरात देशाचा दबदबा निर्माण केला. केंद्र सरकारने गेल्या 7 वर्षात विद्यार्थी, गृहिणी, महिला, शेतकरी, कामगार, कष्टकरी मच्छीमार अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी योजना आणल्या. आणि त्या प्रामाणिकपणे अमलात आणल्या. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे कार्यही उल्लेखनीय आहे. खासकरून कोरोना काळात त्यांनी घेतलेले निर्णय आणि दाखवलेली धडाडी वाखाणण्याजोगी आहे. महामारीचा कठीण प्रसंगी न डगमगता ते कार्यरत राहिल्या. या बळावरच आगामी निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल. आणि भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

पणजी : पाणी साचण्यास गटारातील केबल्स कारणीभूत

Omkar B

मातेला घराबाहेर काढणारा मुलगाच घराबाहेर

Amit Kulkarni

केरीत गव्यारेडय़ाकडून तारेचे कुंपण मोडून शेतीची नासधूस

Omkar B

किनारी विभाग आराखडय़ाला बोरी ग्रामसभेत विरोध

Amit Kulkarni

‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी रेल्वे गाडय़ा रद्द

Omkar B

लॉबेरा आयएसएलची शील्ड आणि चषक जिंकणारे पहिले प्रशिक्षक

Patil_p
error: Content is protected !!