तरुण भारत

मगो राष्ट्रीय पक्षांशी युती करणार नाही

आमदार सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

आगामी 2022 विधानसभा निवडणुकीसाठी मगो पक्ष भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँगेस या पक्षांशी युती करणार नसल्याचे मगोपचे प्रमुख व आमदार सुदिन ढवळीकर यानी जाहीर केले आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की भाजपने मगोपला अपमानित करून अनेकदा डिवचले आहे तसेच युतीमधून बाहेर काढले. त्यामुळे भाजपसोबत युती शक्यच नाही. शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी सोबतही मगोप युतीसाठी जाणार नाही. तसेच मगोप कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी युती करणार नाही असेही ढवळीकर यांनी नमूद केले.

मगो उमेदवारांची संख्या 24 पर्यंत वाढणार

ते म्हणाले की मगोप हा राज्यातील सर्वात जुना राजकीय पक्ष असून मगोपने 2012 च्या निवडणुकीत भाजपशी युती केली होती. पर्रीकर यांच्या सरकारात मगो पक्षाचा वाटा होता. मगो पक्षाचे 12 मतदारसंघात सक्रीय काम चालू असून तेथे पक्ष उमेदवार देणार आहे तथापि इतर मतदारसंघातही मगोपची तयारी चालू असून पक्षाच्या उमेदवारांची संख्या 24 पर्यंत वाढू शकते असेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

मगो पक्ष यावेळी तरूण वर्गाला वाव देणार असून ते मगोपच्या वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. पक्षाची केंद्रीय समिती युती आणि इतर विषयावर निर्णय घेणार आहे. परंतु भाजपसोबत युती करणार नाही असा विश्वास त्यांनी प्रकट केला. मगो पक्ष सत्तेवर आला किंवा सत्तेत सहभागी झाला तर नवीन शिक्षण धोरण, नवीन मोटर वाहन धोरण लागू करण्यात येणार असून सध्याच्या सरकारकडे त्याची कार्यवाही करण्याची हिंमत नाही. ऑनलाईन शिक्षणात गोवा मागे पडला असून गरीब मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी खंत प्रकट केली. ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाची त्यांनी खिल्ली उडवली आणि गरीब जनतेची कामे कशी होणार? अशी विचारणा केली.

Related Stories

पर्वरी येथे साहा. पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

Amit Kulkarni

गोवा दूरदर्शनवर आजपासून ‘झिलबा राणो’

Omkar B

भाजप सरकारने पेट्रोलचे दर त्वरीत कमी करावे : युरी आलेमाव

Amit Kulkarni

कोरोना नियमावलीचे कठोरतेने पालन करा

Amit Kulkarni

मोप विमानतळ बांधकाम कंपनी जीएमआरला मिळणार वाढीव मुदत

Patil_p

राज्यात 11 ते 14 एप्रिलपर्यंत कोरोना लसीकरण उत्सव

Amit Kulkarni
error: Content is protected !!