तरुण भारत

भंडारी समाजाच्या आमंत्रणावरून केजरीवाल हरवळे रुदेश्वर मंदिरात

प्रतिनिधी /पणजी

आम आदमीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काल सोमवारी गोव्यात दाखल झाले. त्यांनी दिवसभर पक्ष नेतृत्व आणि गोवेकरांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिरात

Advertisements

विमानतळावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले. या दरम्यान त्यांनी टॅक्सी चालकांची भेट घेतली. संघटनेने पर्यटनाची मंदी, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्या केजरीवाल यांना सांगितल्या. 

टॅक्सी चालकांकडून केजरीवालांचे कौतुक

टॅक्सी चालकांनी अरविंद केजरीवाल यांच्या अनेक योजनांचे कौतुक केले. केजरीवाल यांनी दिल्लीतील रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना लॉकडाऊन महिन्यांत 5000 रुपयांची आर्थिक मदत केली होती. तसेच ’मोफत डोअर स्टेप डिलीव्हरी ऑफ रेशन स्कीम’ चे कौतुक केले.

पणजी येथे अरविंद केजरीवाल यांची भंडारी समाजाच्या शिष्टमंडळासह अनेक नेत्यांनी भेट घेतली. भंडारी समाजाने त्यांच्या समस्या अरविंद केजरीवाल यांना सांगितल्या. या भेटी दरम्यान त्यांनी आर्थिक मंदीमुळे लोकांनी  नोकऱया कशा गमावल्या याची माहिती त्यांना दिली. या दरम्यान मंत्री, आमदारांनी कोणतेही सहकार्य केले नसल्याचे त्यांनी केजरीवालांना सांगितले. भंडारी समाजातील तरुणांना स्थानिक आमदार आणि राजकीय नेत्यांकडून कसे फसवले जात आहे यावर प्रकाश टाकण्यात आला.

बैठकीच्या शेवटी, त्यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रुदेश्वर मंदिरात आमंत्रित केले. त्यांचा मान राखत अरविंद केजरीवालजी यांनी रुदेश्वर मंदिराला भेट दिली. तसेच तेथील स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. गोवेकरांनी अरविंद केजरीवाल यांचे गोव्यामध्ये मनापासून स्वागत केले. ते त्यांच्या पुढील घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत, असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे म्हणाले

Related Stories

हवामानात आद्रता वाढल्यामुळे बुरशीच्या प्रमाणात वाढ

Amit Kulkarni

नव्वदीतील रामराय गावकराची चित्रशाळेच्या माध्य़मातून अखंडीतपणे ‘गणेश सेवा’

Patil_p

काणकोणातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा

Omkar B

नागरिकत्व कायदा दुरुस्तीला विरोधामागे दिशाभुलीचा हेतू

Patil_p

गोवा डेअरी कामगारांच्या संपामुळे दूध पुरवठा खंडित

Patil_p

आजपासून दिव्याचा… प्रकाशाचा महोत्सव

Patil_p
error: Content is protected !!