तरुण भारत

भाजपचाच पुन्हा पूर्ण बहुमताने विजय

भाजप निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्ण तयार आहे. भाजप सरकारने गोवा व गोमंकीयांसाठी केलेल्या कामाच्या बळावर जनतेला समोरे जाणार आहे. जिल्हा पंचायत व नगरपालिक निवडणुकीत जनतेने जसा भाजपवर विश्वास दाखविला तसाच विधानसभा निवडणुकीतही दाखविणार आणि भरघोस मतांनी भाजपाला पुन्हा विजयी करील. भाजपला प्रत्येक निवडणूक एक आव्हान असून येत्या निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाणार असून ऐतिहासिक विजय मिळविणार आहे, असा विश्वास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री तथा गोव्याचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

 गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गोव्यात आले आहेत. दोन दिवसांच्या दौऱयावर असलेल्या फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली आहे. त्यांच्या सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्मंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री जी. कृष्ण रेड्डी, केंद्रीयमंत्री दर्शना जरदोष व गोवा प्रभारी सी.टी.रवी  उपस्थित होते.

डॉ. सावंत यांनी धुरा पेलली

 पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोव्याचे विकासपुरुष स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती नसताना गोव्यात पहिल्यांदाच भाजप निवणुकीला सामोरा जाणार आहे. पर्रीकरांनी आधुनिक गोव्याच्या चेहऱयाची मुहुर्तमेढ रोवली आहे. आज ते आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्यानंतर गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याच ताकदीने गोव्याच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे.

भाजप सरकार अभिनंदनास पात्र

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खरोखरच चांगली कामगिरी बजावलेली आहे. कोविड काळात, त्यानंतर आलेल्या वादळ, पुरामुळे गोमंतकीयांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले. सगळ्या स्तरांवरील लोकांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. कोविड काळात कार्यकर्त्यांसह रस्त्यावर येऊन डॉ प्रमोद सावंत काम करताना दिसत होते. लसीकरणाचा आकडा शंभर टक्क्यावर पोचविला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र ठरत आहेत.  येणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मोदीजींकडून गोव्याला नवी दिशा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गोमंतकीयांशी बराच वेळ संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोवा सरकारने केलेल्या कार्याचे कौतुकही केले आहे. मोदीजी गोव्याला नवी दिशा दाखविण्याचे काम करीत आहेत. राज्यातील पर्यटन सुरु होण्याच्या मार्गावर आहे तसेच रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. कोविड महासंकटामुळे गेल्या दोन वर्षात विकासकामांची गती मंदावली होती. आता अधिकाधिक साधनसुविधा प्रकल्प पूर्णत्वाकडे पोचले असून सरकार अधिक ताकदीने काम करीत आहे.

सरकार आपल्या द्वारी’ उपक्रम वाखाणण्यासारखा

‘सरकार आपल्या द्वारी’ हा नवा उपक्रम सरकारने सुरु केला असून तो वाखाणण्यासारखा आहे. हा एक अभिनव संकल्प आहे. भाजप पक्ष म्हणून मजबूत संघटना तयार करण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसला ना नेतृत्व ना विश्वासार्हता

काँग्रेसकडे आज सक्षम नेतृत्व नाही. काँग्रेसचे नेतेच पूर्णवेळ अध्यक्ष द्या म्हणून हायकमांडकडे मागणी करीत आहेत. काँग्रेसचे नेते पार्टटाईम काम करीत असल्याने त्यांची काय स्थिती झाली हे समजणे कठीण नाही. आज काँग्रेस समोर वाश्वसहर्तेचे मोठे संकट उभे राहिले आहे.

निवडणुका आल्यावर सरसावणारे पक्ष

निवडणुका आल्या की पोस्टर, बॅनर लावणारे पक्षही सरसावत असतात. त्यातीलच एक म्हणजे आम आदमी पक्ष. काही राजकीय पक्षांचे कार्य अराजकतेचे आहे. अराजकतेने देश चालत नाही तर देश चालविण्यासाठी विचार निती आणि रीती लागते ती भाजपाकडे आहे. रीती नितीने व विकासाची कास धरून देश चालविण्याची क्षमता भाजपकडे आहे असेही फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचे नेते भाजपात का येतात, याचा विचार करावा

पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की आज काँग्रेस पक्षातील नेते भाजपमध्ये का येतात, याचा विचार काँग्रेसने करणे जरूरीचे आहे. 2022 मध्ये कुणालाही भाजपात घेण्याची गरज पडणार नाही, कारण 2022 च्या निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एका घरातील एकाच व्यक्तीला उमेदवारी देणे हे भाजपाचे धोरण आहे. गोव्यात उमेदवारी ठरविण्याची जबाबदारी संसदीय मंडळाची आहे असेही फडणवीस म्हणाले.

Related Stories

विविध करामध्ये वाढ करण्याचा म्हापसा पालिकेच्या बैठकीत प्रस्ताव

Amit Kulkarni

गुळेलीत सरकारी जमिनीत चिरेखाणीचा व्यवसाय

Patil_p

गोव्यात 31 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

Rohan_P

शोक करायचा की, मृत्यू दाखला शोधायचा !

Patil_p

ऑक्सिजनअभावी सरकारचाही गुदमरतोय श्वास

Amit Kulkarni

नेव्हल एव्हिएशन म्युझीयमचा आज 23 वा वर्धापनदिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!