तरुण भारत

बेळगावात लवकरच ‘सीर्फ होममेड ऍप’

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावमध्ये लवकरच घरगुती खाद्यपदार्थ आणि घरगुती जेवण यांची सेवा देणारे ‘सीर्फ होममेड’ हे व्यासपीठ लवकरच उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत स्थानिक घरगुती जेवण व पदार्थ बनविणाऱया लोकांना प्राधान्याने महिलांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. लवकरच होममेड ऍपचा शुभारंभ होणार असल्याची माहिती संचालिका नीती कोरे व सोनाली कुटे यांनी दिली.

Advertisements

हॉटेल इफा येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सीर्फ होममेडच्या लोगोचे अनावरण खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱया सीर्फ होममेडला शुभेच्छा दिल्या.

सोनाली आणि निती यांनी सांगितले की, आजपर्यंत विविध कंपन्या हॉटेलमधील पदार्थ घरपोच देत आहेत. मात्र सीर्फ होममेड अंतर्गत ग्राहकांना घरगुती जेवण आणि पदार्थ उपलब्ध होणार आहेत. बहुसंख्य लोकांना प्राधान्यांने वृद्धांना आणि नोकरदार व्यक्तींना घरगुती पदार्थ सहजगत्या उपलब्ध व्हावेत, असे वाटते. ही सेवा आम्ही पुरविणार आहोत.

बेळगावमधील खाद्य पदार्थ आणि जेवण तयार करणाऱया 150 जणांनी नाव नोंदणी केली असून पक्ष पंधरवडय़ानंतर लवकरच ही सेवा सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे कार्यालय, बँक कर्मचाऱयांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असून रुग्णांसाठी ‘डाएटफुड’ सुद्धा पोहोचविले जाणार आहेत. प्रत्येक पदार्थांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासून मगच नाव नोंदणी करुन घेतली आहे. दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आशा पोफळे यांनी सूत्रसंचालन करुन होममेडचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी अशोक पोफळे, गुरूदेव कोरे उपस्थित होते.

Related Stories

ट्रक-दुचाकी अपघातात दोघे ठार

Patil_p

बेळगाव शहरातील 78 जण कोरोनाबाधित

Patil_p

कणबर्गी येथे मध्यरात्री जुगारी अड्डय़ावर छापा

Rohan_P

विकासकामे तातडीने पूर्ण करा

Amit Kulkarni

बेळगाव शहर विभागातून 15 शिक्षक उमेदवारांचे अर्ज मागे

Patil_p

स्तवनिधी ब्रह्मदेवाची 24 रोजी यात्रा

Patil_p
error: Content is protected !!