तरुण भारत

दापोलीतील विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद जोशी यांचे निधन

मौजेदापोली /वार्ताहर

दापोली येथील रहिवासी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद दिनकर जोशी यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.

कै. डॉ. जोशी यांनी कृषी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून तर उद्यान विद्या विभागाचे प्रमुख, त्यानंतर ते शिक्षण संचालक म्हणून काम केले. त्यांनी विद्यापीठात 35 वर्ष सेवा बजावली. त्याच बरोबर दापोली येथील कुणबी सेवा संघांचे ते उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. जोशी यांनी विद्यापीठासह अनेक संस्थावर विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Stories

‘त्या’ संचालकास न्यायालयीन कोठडी

Patil_p

अनेक गाडय़ा अन्य मार्गे वळविल्या, काही रद्द

NIKHIL_N

कृषि अभ्यासक्रम प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

triratna

रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण, तर तेरा जणांनी केली कोरोनावर मात

triratna

ढगफुटीवजा पावसाने रत्नागिरी शहरात दाणादाण

Patil_p

जिल्ह्यात उदयापासून शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला

NIKHIL_N
error: Content is protected !!