तरुण भारत

परिवहन कर्मचाऱयांचे निलंबन, बदली प्रक्रिया मागे

प्रतिनिधी /बेळगाव

परिवहन कर्मचाऱयांनी एप्रिल दरम्यान विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन छेडले होते. त्यामुळे परिवहनला आर्थिक फटका बसला होता. कर्मचाऱयांनी बरेच दिवस आंदोलन मागे न घेतल्याने शासनाने कर्मचाऱयांवर दबाव टाकण्यासाठी निलंबनाची कारवाई केली होती. तसेच काही कर्मचाऱयांसाठी बदली प्रक्रियादेखील राबविली होती. मात्र आता परिवहनने निलंबनाची कारवाई मागे घेतली असून बदली प्रक्रियादेखील थांबविली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisements

परिवहन कर्मचाऱयांनी सहाक्या वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन छेडले होते. दरम्यान पंधरा दिवसांहून अधिककाळ आंदोलन हाती घेतल्याने बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शासनाने दबावतंत्राचा वापर करत कर्मचाऱयांना सक्तीची बदलीप्रक्रिया लादली होती. मात्र आता ही बदली प्रक्रिया मागे घेण्यात आली आहे. बेळगाव आगारात काम करणाऱया 97 कर्मचाऱयांची हावेरी, गदग व इतर ठिकाणी बदली करण्यात येणार होती. इतर ठिकाणांच्या कर्मचाऱयांची बेळगावात नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय बेळगाव विभागातील 8 कर्मचाऱयांना बडतर्फ तर 56 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान या कारवाई विरोधात कर्मचाऱयांनी न्यायालयात धाव घेतली होती.

बेळगाव विभागातील ज्या कर्मचाऱयांची बदली करण्यात आली होती ते कर्मचारी परत बेळगाव विभागातच काम करणार आहेत. कर्मचाऱयांनी छेडलेले आंदोलन दडपण्यास शासन यशस्वी ठरले होते. कर्मचाऱयांची निलंबित कारवाई आणि बदली प्रक्रिया मागे घेतल्याने कर्मचारी पूर्ववत बस आगारात नियुक्त होणार आहेत.

Related Stories

वडगाव बाजार गल्लीत बॅरिकेड्स लावून अडवणूक

Patil_p

इंडियन क्राफ्ट बाजारला बेळगावकरांचा वाढता प्रतिसाद

Amit Kulkarni

खानापुरात नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा भगवेमय सत्कार

Patil_p

हेमु कलानी चौकात कचरा

Patil_p

आरपीडी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

बेळगावात साकारणार ऍस्ट्रोटर्फ स्टेडियम

Patil_p
error: Content is protected !!