तरुण भारत

गुजरातमध्ये १९ हजार कोटींचे हेरॉईन जप्त

गुजरात/प्रतिनिधी

गुजरातमध्ये अफगाणिस्तानहून तस्करी झालेले १९ हजार कोटींचे हेरॉईन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सुमारे तीन टन हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेलया हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १९ हजार कोटी रुपये आहे. हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कारवाईत दोन जणांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

गुजरातमधील मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमध्ये ठेवलेले हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहे. हेरॉईनची किंमत तब्बल १९ हजार कोटी रुपये आहे. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये जवळपास २ हजार किलो हेरॉईन आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये १ हजार किलो हेरॉईनची खेप अफगाणिस्तानातून आली होती. हे कंटेनर इराणमधील एका बंदरातून गुजरातला पाठवण्यात आले होते. माहिती मिळाल्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी येथे शोध मोहीम राबवण्यात आली. त्याच दरम्यान मुंद्रा बंदरावर हे हेरॉईन जप्त करण्यात आले, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

कृषी कायदे आंदोलन; दोन आठवड्यात तोडगा काढा; SC ची केंद्राला ताकीद

triratna

कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊन नाहीः मंत्री सुधाकर

triratna

पुलवामात दहशतवाद्याचा खात्मा; एकाचे आत्मसमर्पण

datta jadhav

WHO कडून मुंबईतील धारावी मॉडेलचे कौतुक

datta jadhav

सौर वादळ कोणत्याही क्षणी पृथ्वीवर

datta jadhav

देशात 99.06 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav
error: Content is protected !!