तरुण भारत

समारंभ-कार्यक्रमासाठी परवानगी घेणाऱयांच्या संख्येत घट

अद्यापही परवानगी बंधनकारक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मागील काही दिवसात मुहूर्त कमी झाल्याने लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम कमी झाले आहेत. त्यामुळे तहसीलदार कार्यालयातून कार्यक्रमासाठी परवानगी घेणाऱयांची संख्या घटली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी तहसीलदार कार्यालयातून परवानगी घेणे बंधनकारक आहे. लॉकडाऊन काळात परवानगीसाठी दैनंदिन 40-50 अर्ज दाखल व्हायचे. मात्र लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर परवानगी घेणाऱयांची संख्या पूर्णपणे कमी झाली आहे.

लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात आहे. शासनाच्या नियमानुसार 400 वऱहाडी मंडळी उपस्थित राहू शकतात. शिवाय गृहप्रवेश इतर घरगुती कार्यक्रमांना 100 जण उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात आहे. आता परवानगी घेणाऱयांसाठी संख्या कमी झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनतेने देखील परवानगी घेण्याचे टाळले आहे. सर्रास कार्यक्रमाना उपस्थित राहणाऱयांची संख्या कमी झाल्याने परवानगी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

लग्न समारंभ व इतर घरगुती कार्यक्रमांना परवानगी घेण्याचे टाळले जात असले तरी शासनाच्या नियमानुसार अद्याप परवानगी घेणे बंधनकारक आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. सध्या लग्न कार्यासाठी 400 जणांना परवानगी दिली जात असल्याने त्यांची नावे अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहेत.

सर्वच गोष्टींना शिथीलता देण्यात आल्याने परवानगी घेणाऱयांची संख्या घटली आहे. मागील काही दिवसात हातावर मोजण्याइतकेच परवानगीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. काही ठिकाणी मोजक्मयाच जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असले तरी परवानगी घेणे आवश्यक आहे.

व्ही. मोहन (तहसीलदार ग्रेड 2)

Related Stories

पोलिसांकडून परवानगी घ्या; विवाह करा

Patil_p

तहसीलदार कार्यालयातील उतारा केंद्र बंद

Patil_p

मनपा निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Patil_p

युवा कीर्तनकाराचा आवाज पोहोचला मुंबई दरबारी

Amit Kulkarni

बँकांच्या वेळेत बदल करा

Amit Kulkarni

यंदा परिवहनच्या व्यावसायिक हंगामावर पाणी

Patil_p
error: Content is protected !!