तरुण भारत

गणेबैलजवळ खडीने भरलेला टिप्पर जळून खाक

खानापूर / प्रतिनिधी

बेळगाव-पणजी महामार्गावरील गणेबैल गावाजवळ खडी पावडरने भरलेल्या दहाचाकी टिप्पर क्रमांक के. 22-बी-8337 चा समोरील टायर अचानक फुटल्याने त्या टिप्परला आग लागली. व बघता-बघता तो टिप्पर जळून खाक झाला. नशीबाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

Advertisements

घटनेची हकीकत अशी की, बेळगावहून खानापूरकडे दहाचाकी खडी पावडर भरलेला वरील क्रमाकांचा टिप्पर गणेबैल गावाजवळ सुरू असलेल्या टोलनाक्यापासून काही अंतरावर आला असता त्या टिप्परचा समोरील टायर अचानक फुटला. यामुळे तो टिप्पर टोलनाक्याच्या बांधकामावर चढून पलटी झाला. त्यातच त्याची डिझेल टँकही फुटून झालेल्या घर्षणामुळे त्या टिप्परला आग लागली. बघता-बघता आगीने संपूर्ण टिप्परला वेढले. पण टिप्पर चालकाने मोठय़ा शिताफिने टिप्परमधून उडी घेतली. यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही. आजुबाजूच्या लोकानी येऊन टिप्परला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. खानापूरहून अग्निशमन दलाचा बंबही मागवण्यात आला. त्यांनी केलेल्या पाणी फवारणीमुळे अखेर आग आटोक्यात आली. पण त्यामध्ये टिप्पर मात्र पूर्णतः जळाला. सदर टिप्पर लोंढा येथील बापशेट यांच्या मालकीचा असल्याचे समजते. या घटनेची खानापूर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे..

Related Stories

बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड

Omkar B

मुतगा येथे मटकाबुकीला अटक

Rohan_P

सरकारची अवस्था नाविक नसलेल्या बोटीसारखी : दिनेश गुंडूराव

triratna

हालग्याजवळ पडलेल्या ‘त्या’ निराधार व्यक्तीला तातडीची मदत

Patil_p

सुस्थितीतील रस्त्यांचा विकास करण्याचा सपाटा

Amit Kulkarni

परिवहनला लागले उत्पन्न वाढीचे वेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!