तरुण भारत

शिंदोळी येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करावे

जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शिंदोळीसह परिसरामध्ये आरोग्य केंद्र नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. जवळपास शिंदोळी आणि इतर गावांची लोकसंख्या 25 ते 30 हजार आहे. मात्र आरोग्य केंद्र नसल्यामुळे उपचारासाठी शहराकडे सर्वांना धाव घ्यावी लागत आहे. तेंव्हा तातडीने शिंदोळीमध्ये उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी देवरअन्न फौंडेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.

शिंदोळी, बसवनकुडची, बसरीकट्टे, अलारवाड, मास्तमर्डी या गावांची लोकसंख्या 25 ते 30 हजार आहे. परंतु या गावच्या परिसराला आरोग्य केंद्रच नाही. त्यामुळे शहराशिवाय पर्याय नाही. काही खासगी डॉक्टर असले तरी ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच वृध्द व महिलांना त्याचा मोठा त्रास होत आहे. तेंव्हा तातडीने उपआरोग्य केंद्र शिंदोळीत स्थापन करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष सुनील कोलकार, उपाध्यक्ष उदय कुमार, संतोष तेळीमनी, शिवानंद कोलकार, आकाश हलगेकर, आनंद चौगुले, विजय पाटील, विशाल हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

कोरोनापासून सतर्कता बाळगा : पालकमंत्री

Omkar B

यमनापूर येथील ती जागा राखीव ठेवा

Amit Kulkarni

काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने माती परीक्षण कार्यक्रम

Patil_p

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या ‘मराठा शौर्य दिन’

Amit Kulkarni

सीमा लाटकर यांची बदली अखेर रद्द

sachin_m

गणेश विसर्जन कुंडात करण्याचे आवाहन

Amit Kulkarni
error: Content is protected !!