तरुण भारत

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा पीयुसीचा निकाल 23.92 टक्के

प्रतिनिधी /बेळगाव

पीयुसीच्या द्वितीय वर्षाचा निकाल सोमवारी जाहिर झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल केवळ 23.92 टक्के इतका लागला. परिक्षेसाठी 531 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 67 विद्यार्थी तर 60 विद्यार्थीनींचा समावेश आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा घसरलेला निकाल पाहुन चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisements

यावषी कोरोनामुळे पीयुसीचा अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात आली नाही. 11 वी चे गुण व बारावीच्या अंतर्गत परीक्षांचे गुण यांचे मुल्यमापन करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आला. परंतु हा निकाल काही विद्यार्थ्यांना मान्य नव्हता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी परीक्षा मंडळाने जाहिर केला.

आर्ट्स विभागामध्ये 94 (23.1 टक्के), कॉमर्स 122 (25.41), सायन्स 2 (100 टक्के), शहरी भागाचा निकाल (25.83 टक्के) तर ग्रामीण भागातील निकाल (21.4 टक्के) इतका लागला आहे. निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Related Stories

माहिती-प्रसिद्धी खात्यातर्फे सोमवारी प्रशिक्षण शिबिर

Omkar B

वर्षाचा अवधी, खुनाचा तपास कधी?

Amit Kulkarni

कोरोनामुळे आणखी तिघेजण दगावले

Amit Kulkarni

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाकडे शिवनेरी चषक

Amit Kulkarni

शाई हल्ल्याचा शिनोळी येथे निषेध

Amit Kulkarni

सीसीटीव्ही खांबाला वाहनाची धडक

Amit Kulkarni
error: Content is protected !!