तरुण भारत

चेकपोस्टना जिल्हाधिकाऱयांची भेट

कागवाड, कोगनोळी येथे केल्या सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी मंगसुळी, कागवाड व कोगनोळी चेकपोस्टना भेट देऊन पाहणी केली. कोरोना थोपविण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गसुचींचे चेकपोस्टवर काटेकोर पालन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

सरकारी मार्गसुचीनुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. केवळ निगेटिव्ह अहवाल असणाऱयांनाच कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी चेकपोस्टवरील कर्मचाऱयांना केली.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांसाठी 72 तासातील आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. बसमधून येणाऱया प्रवाशांचा अहवाल वाहकांनी तपासावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

Related Stories

महाराष्ट्रातील तिसऱया शहराला मिळणार विमानसेवा

Patil_p

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

Omkar B

शहापूरच्या श्रीराम मंदिरात तुकाराम बीजनिमित्त पारायण

Amit Kulkarni

यथिंद्र सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह

triratna

ड्रेनेजसाठी कपिलेश्वर कॉलनीत पुन्हा खोदाई

Amit Kulkarni

डोक्यावरून मैला वाहून नेणाऱया कुटुंबांचा सर्व्हे सुरू

Patil_p
error: Content is protected !!