तरुण भारत

साडेसतरा तास चालले गणेश विसर्जन सोहळा

सकाळी 6 च्या सुमारास मनपाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, कोरोना नियमावलीचा फज्जा, तरुणांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांकडून किरकोळ लाठीहल्ला, परवानगी नसतानाही डीजेचा दणदणाट

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव शहरात रविवारी तब्बल साडेसतरा तास गणेशमूर्तींचे विसर्जन चालले. पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन सकाळी 10.30 वा. झाले तर महानगरपालिकेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सोमवारी सकाळी 6 वाजता झाले. यामुळे गणेशमूर्ती विसर्जन सोहळा साडेसतरा तास चालला. काही मंडळांनी गणेशमूर्ती मंडपातून वेळेत बाहेर न काढल्याने विसर्जनासाठी विलंब होत गेला. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचा फज्जा उडल्याचे चित्र दिसून आले.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात रविवारी घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी 10.30 वा. भातकांडे गल्लीच्या गणेशमूर्तीचे प्रथमतः विसर्जन झाले. त्यानंतर एकामागून एक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. परंतु दुपारनंतर मात्र विसर्जनामध्ये खंड पडला. रात्री 8 नंतर पुन्हा एकदा गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरूवात झाली. काही मंडळांनी गणेशमूर्ती वेळेत बाहेर न काढल्याने विसर्जनासाठी विलंब झाला. शेवटी कोणत्या गल्लीचे विसर्जन होणार यावरून मागील काही वर्षांमध्ये वाद निर्माण होत होते. त्यावर तोडगा म्हणून सर्वांत शेवटी महानगरपालिकेच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे. यावषी देखील सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास मनपाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

डीजेमुळे विसर्जन मिरवणूक लांबली

राज्यात रात्री 9 वाजता नाईट कर्फ्यू लागू होत असल्याने त्यापूर्वी गणेश विसर्जन पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या होत्या. परंतु काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन करीत डीजे लावलीच. शेकडो तरुण डीजेसमोर थिरकत असल्याने विसर्जनासाठी येणाऱया गणेशमंडळांना थांबावे लागले. त्यामुळे ही विसर्जन मिरवणूक लांबली गेली. यामुळे गणेशभक्तांसह प्रशासकीय कर्मचारीही ताटकळत बसले होते. पोलिसांनाही काही कार्यकर्ते जुमानत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे काही ठिकाणी तरुणांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना किरकोळ लाठीहल्ला करावा लागला.

कोरोना नियमावलीचा उडाला फज्जा

कोरोनाच्या दोन लाटांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच तिसरी लाट येण्याची शक्मयता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. परंतु गणेश विसर्जनासाठी रविवारी रात्री बेळगाव शहर व उपनगरांमध्ये तुफान गर्दी झाली होती. ना सामाजिक अंतर व तोंडावर मास्क असे चित्र होते. मोठय़ा लोकांसोबतच चिमुकलेदेखील त्यांच्यासोबत गर्दीत सामील झाले होते. गर्दीमधील कोणालाच कोरोनाचे भाग नसल्याचे दिसत होते. यामुळे कोरोना नियमावलीचा फज्जा तर उडालाच परंतु याचे परिणाम काही दिवसांनी शहरात दिसतील असा अंदाज जाणकारांमधून व्यक्त करण्यात आला. 

अखेर डीजेचा दणदणाट झालाच

गर्दी न करता कमीत- कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्याच्या सूचना राज्यसरकारने केल्या होत्या. त्यामुळे काही मंडळांनी दिलेल्या वेळेत मोजक्मया कार्यकर्त्यांना घेवून गणेशमूर्तीचे विसर्जन केले. परंतु रात्री 9 नंतर मात्र काही मंडळांनी प्रशासनाचे नियम झुगारून डीजे लावलाच. यामुळे डीजेसमोर हजारो तरुण थिरकत असल्याचे व्हिडीओ सर्वत्र सर्वत्र व्हायरल होवू लागले आहेत. परवानगी नसतानाही डीजे लावलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. डीजे समोर थिरकणाऱया तरुणांच्या तोंडाला ना मास्क ना सामाजिक अंतर त्यामुळे हे कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठीचे आमंत्रण तर ठरणार नाही ना? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

दोन पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल

गणेशोत्सव विसर्जनामध्ये एकाच ठिकाणी गर्दी करत कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले. या विरोधात खडेबाजार व मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिलेश्वर विसर्जन तलावावर गर्दी झाल्याने कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले. त्यामुळे मार्केट पोलीस स्थानकात एक हजारहून अधिक अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर खडेबाजार पोलीस स्थानकातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पोलिसांकडून लाठी हल्ला

काही गणेशोत्सव मंडळांनी डीजे लावला होता. या डीजेसमोर हजारो तरुण थिरकत होते. यामुळे एकाच ठिकाणी गणेशमूर्ती अडकल्या होत्या विसर्जनासाठी अधिक कालावधी लागत असल्यामुळे अखेर पोलिसांनी लाठीहल्ला करण्यास सुरूवात केली. वारंवार सांगून देखील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. डीसीपी विक्रम आमटे, एसीपी एन. व्ही. बरमणी, एसीपी ए. चंद्राप्पा यांनी स्वतः रस्त्यावर उतरत मंडळांना गणेशमूर्ती पुढे नेण्यास भाग पाडले. यामुळे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Related Stories

अवघा तालुका रंगला पंचमीच्या रंगात!

Amit Kulkarni

गोकर्णनजीक तदडी बंदरात सापडला 500 किलोचा व्हेल शार्क मासा

Amit Kulkarni

कडोलकर गल्लीतील रस्ता गटार बांधकामामुळे बंद

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात पाच उपआरटीओ कार्यालये

Patil_p

कंग्राळ गल्ली येथे आरोग्य तपासणी शिबिर

Amit Kulkarni

सराफाच्या कारची काच फोडून 22 तोळय़ाचे दागिने पळविले

Rohan_P
error: Content is protected !!