तरुण भारत

चप्पल निवडताना

चेहरा आणि ड्रेस, ज्युलरी या इतक्याच गोष्टी व्यक्तिमत्वात भर घालतात असे नाही; तर या सर्वांबरोबर आवश्यकता असते ती सुंदर चपलांची. म्हणूनच चपलांची निवड करतानाही थोडा विचार करणं गरजेचं ठरतं…

  • चपला म्हटल्यावर विविध प्रकार, उंच टाचेच्या, फ्लॅट चप्पल, वेगवेगळ्या पद्धतीचे बूट आणि असं बरचं काही….
  • उंच टाचेच्या चप्पल वापरणं आजकाल खूप रेग्युलर बाब झालीय. ड्रेसवर मॅचिंग चप्पल घेताना अनेकजणी उंच टाचांच्या सँडल्स घेणंच पसंत करतात. अगदी तरुणींपासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत. अनेकींची पसंती हाय हिल्सना मिळत असते. पण, सतत हाय हिल्स वापरण्यामुळे पायांच्या अनेक समस्या उद्भवतात.
  • उंच टाचांच्या चपला सतत घातल्याने शरीराचा संतुलित प्रमाणात विभागलेला भार बदलून शरीर डगमगते. शरीराचा संपूर्ण भार गुडघ्यांवर पडतो. परिणामी, हाडांवरील मऊ आवरणाची झीज होते आणि तिचं सांधेदुखीत रुपांतर होतं.
  • सिने आणि टी.व्ही. कलाकार मॉडेल्स यांना त्यांच्या क्षेत्रात काम करताना अशा चपला वापरणं गरजेचं झालेलं असतं आणि आपल्याकडे बरीचशी फॅशन ही या सेलिब्रिटीजना पाहूनच येत असते. ग्लॅमर जगातील  या स्त्रियांना पाहून अनेकजणी अशा उंच टाचेच्या चपला वापरतात. पण अशा प्रकारचे चप्पल वापरताना त्याचा आपल्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
  • हाय हिल्स घातल्यामुळे शरीर पुढच्या बाजूला झुकतं. पाठीच्या मणक्यावर ताण येतो. यामुळे  पाठदुखीलाही सामोरं जावं लागतं. जाड महिलांनी या चपला टाळणेच बरे.
  • म्हणूनच उंंच टाचेच्या चपला रोज थोडय़ा वेळासाठीच वापरा. नेहमीच्या कामाला जाताना फ्लॅट चपला वापरा. ङउंच टाचेच्या चपला घेताना त्या चपला ब्रँडेड असतील, याची काळजी घ्या. नेहमीच्या वापरात साधारण एक इंच उंच टाचा असणार्या चपला वापरणं शरीरासाठी योग्य ठरतं.

Related Stories

अन्न वाया जाऊ नये म्हणून…

Amit Kulkarni

कौशल्य वाढवा

Omkar B

जुन्याला द्या नवं रुप

Omkar B

फंडा नो कॉस्ट ईएमआयचा

Omkar B

आजारपणात घ्या त्वचेची काळजी

Amit Kulkarni

परफेक्ट मेक अप फॉर परफेक्ट लूक

Omkar B
error: Content is protected !!