तरुण भारत

फलटणमध्ये कारची काच फोडून 2 लाख लांबविले

फलटण / प्रतिनिधी :

फलटण शहरातील डेक्कन चौकात पार्क केलेल्या कारची काच फोडून सीटवर ठेवलेली २ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना फलटणमध्ये आज दुपारी घडली.

Advertisements

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, फलटण शहरातील डेक्कन चौक येथील हॉटेल अशोका समोरील रोडलगत पार्क करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारच्या ( एम एच ११ सी डब्ल्यू ८१४८ ) मागील डाव्या बाजुची काच अज्ञात चोरट्यानी फोडुन सीटवर दोन लाख रुपये ठेवलेली बॅग लंपास केली.

वेळोशी (ता. फलटण) येथील अक्षय माने हे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. ते पत्नी व वडील यांच्यासह आपल्या चारचाकीत फ्लॅटखरेदीसाठी फलटणला आले होते. त्यांनी कर्ज प्रकरण प्रक्रिया करण्यासाठी येथील शिवकृपा पतसंस्थेतून दोन लाख रुपये काढले. ते पैसे गाडीत डेक्कन चौकात गाडी पार्क करून नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. नाश्ता झाल्यानंतर गाडीजवळ येताच गाडीची काच फोडुन पैसे चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावळ करीत आहेत.

Related Stories

साताऱयात शिथीलता दिली अन् गर्दी वाढली

Patil_p

माची, केसरकर पेठेवर दरड कोसळण्याची भीती

Patil_p

वाईत चोरटय़ांचा धुमाकूळ ; सहा दुकाने फोडली..

Patil_p

उच्चांकी बाधित वाढ अन् मृत्यूसत्रही थांबेना

Patil_p

सातारा : ब्रह्ममुंबई मनपाच्या ऑनलाईन वर्गात मोफत प्रवेश

triratna

सातारा : पाचगणीत रुग्णवाहिकेने उडवली चार वाहने

datta jadhav
error: Content is protected !!